पुण्यात 5 किलो अफिम जप्त, तिघांना अटक

By Admin | Updated: March 22, 2017 10:32 IST2017-03-22T10:32:07+5:302017-03-22T10:32:07+5:30

पुण्यात केईएम हॉस्पिटलसमोरील एक्सेज लॉजमधून 5 किलोचे अफीम जप्त करण्यात आले.

In Pune, 5 kg of opium was seized, three were arrested | पुण्यात 5 किलो अफिम जप्त, तिघांना अटक

पुण्यात 5 किलो अफिम जप्त, तिघांना अटक

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 22 - गुन्हे शाखेकडून 5 किलो अफीम जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.  
 
बुधवारी मध्यरात्री 1.10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील के.ई.एम हॉस्पिटलसमोरील एक्सेल लॉज रुम क्रमांक 103 मध्ये तीन जण अफीमची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. कारवाईदरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघांकडून 5 किलो अफीम आढळून आले. या अंमली पदार्थाची किंमत   १२,५०,००० रुपये एवढी असल्याचे बोललं जातं आहे. 
 
राणा पटेल (वय 23), रुपाराम पटेल (वय 25) आणि सरवण पटेल (वय 24) अशी अटक केलेल्या तिघांची नावं आहेत. या तिघांकडील अमली पदार्थसहीत अन्य मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. 
 

Web Title: In Pune, 5 kg of opium was seized, three were arrested