मराठमोळी 'बाहुबली'! 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 02:24 PM2021-06-17T14:24:48+5:302021-06-17T14:28:51+5:30

पुण्यातील 37 वर्षीय डॉ. शर्वरी यांचे म्हणणे आहे, की वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केले आहे.

Pune 37 year old doctor sharvari inamdar does push ups deadlift and incline bench press in saree  | मराठमोळी 'बाहुबली'! 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video

मराठमोळी 'बाहुबली'! 37 व्या वर्षीही जबरदस्त फिटनेस; साडी नेसूनही करतात वर्कआउट, पाहा Video

Next

पुणे- डॉक्टर शर्वरी इनामदार (doctor sharvari inamdar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओत त्या साडीवरच पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इंक्लाइन बेंच प्रेस सारखी एक्सरसाइज करताना दिसत आहेत. 37 वर्षीय डॉ. शर्वरी यांचे म्हणणे आहे, की वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केले आहे. डॉ. शर्वरी यांना इंस्टाग्रामवर 4 हजारहून अधिक लोक फॉलो करतात. (Pune 37 year old doctor sharvari inamdar does push ups deadlift and incline bench press in saree)

साडीवर सहजपणे केले वर्कआऊट -
डॉ. शर्वरी यांनी हा व्हिडिओ 12 जूनला इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बातमी लिहेपर्यंत 1 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर काही लोकांनी प्रतिक्रिया देत डॉ. शर्वरी यांचा हा व्हिडिओ प्रेरक आणि ट्रेंड सेटर असल्याचेही म्हटले आहे.

याला म्हणतात ट्रांसफॉर्मेशन… -

डॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदात एमडी केले आहे -
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदात एमडी केले आहे. त्या पती आणि दोन मोलांसह पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात गंगा धाम फेस-2 येथे राहतात. त्यांनी चार वेळा आशियन उमन वेट ट्रेनिंग अवार्ड जिंकला आहे. त्यांचा मोठा मुलगा 17 वर्षांचा, तर छोटा मुलगा 14 वर्षांचा आहे. 


डॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टर
यासंदर्भात डॉ. शर्वरी यांनी सांगितले, की 4 वर्षांपूर्वी त्या स्वतः फिटनेससाठी वॉकिंग, रनिंग, योगा करत होत्या. मात्र, तरीही त्यांना काही कमतरता जाणवत होती. डॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी शर्वरी यांना वेट ट्रेनिंग आणि जिम जॉइन करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या हळू-हळू वेट ट्रेनिंग करू लागल्या.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune 37 year old doctor sharvari inamdar does push ups deadlift and incline bench press in saree 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app