शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरप्रश्नी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी

By admin | Updated: January 14, 2015 04:03 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव देण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे

लोणी (अहमदनगर) : ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपीप्रमाणे भाव देण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे शिष्टमंडळ नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना तोडफोड करून जनतेचे लक्ष विचलीत करून प्रश्नाचे गांभीर्य कमी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मंगळवारी सकाळी विखे यांनी ऊसदराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. चर्चेचा तपशील देताना ते म्हणाले, की या प्रश्नावर सरकारने पॅकेज जाहीर करावे आणि साखर कारखान्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळाला पाहिजे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी. सवलती मिळाल्यामुळे सहकारी साखर कारखाने चांगला भाव देण्यासाठी पुढाकार घेऊ शकले. मात्र आज सत्तेतील भागीदार पक्ष सरकारवर दबाव आणण्याऐवजी कारखान्यांवर कारवाईची आश्चर्यकारक भूमिका घेताना दिसतात. सत्तेतील भागीदारांनी पंढरपूर ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला असता तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते, अशी टीकाही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर केली. (प्रतिनिधी)