शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस नसल्यास माहिती द्या

By admin | Updated: April 11, 2015 05:46 IST

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा स्थानकात लोकल येताच महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातून मोबाइल चोरून नेण्याची घटना घडली.

मुंबई : गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा स्थानकात लोकल येताच महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातून मोबाइल चोरून नेण्याची घटना घडली. या घटनेमुळे महिलांचा रात्रीचा प्रवास सुरक्षित नसल्याचे उघड झाले. या घटनेनंतर या डब्यात रेल्वे पोलीस (जीआरपी) होते की नव्हते असा नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर जीआरपीने महिला आरक्षित डब्यात पोलीस नसल्यास नियंत्रण कक्ष किंवा महिला निर्भया हेल्पलाइनला तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मनीषा मोहिते या डोंबिवली येथे राहतात. ८ एप्रिल रोजी मनीषा यांनी मध्यरात्री कुर्ला येथून ठाणे लोकल पकडली आणि त्या मुलुंड स्थानकात डोंबिवलीला जाणारी लोकल पकडण्यासाठी उतरल्या. त्यांनी मुलुंड स्थानकातून मध्यरात्री १.२0 वाजता कर्जत धीमी लोकल पकडली आणि मोटरमनच्या शेजारील महिला डब्यातून त्या प्रवास करू लागल्या. ही लोकल मध्यरात्री १.३५ वाजता कळवा स्थानकात येथे येताच एक चोर मोबाइल चोरण्याच्या उद्देशाने थेट या महिला डब्यात चढला आणि त्याने मनीषा यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. त्याला मनीषा यांनी विरोध करताच चालत्या लोकलमधून कळवा स्थानकात उतरत चोराने मोबाइल जबरदस्तीने चोरून नेला. यानंतर ठाणे रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या डब्यात पोलीस नसल्यानेच ही घटना घडल्याचे समोर आले. मात्र या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून त्वरित खुलासा करण्यात आला. सीएसटी-कर्जत लोकल ही साडे बारा वाजता सीएसटीवरून सुटते. त्या वेळी लोकलमधील ६व्या महिला डब्यात जीआरपी पोलीस, ९व्या डब्याकरिता होमगार्ड आणि १२व्या डब्याकरिता जीआरपी आहेत आणि ते सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले आहे. आता रात्रीच्या वेळी प्रवास करताना महिला सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात त्याच डब्यातून महिलांनी प्रवास करावा. आरक्षित डब्यात पोलीस नसल्यास त्याबाबत तत्काळ जीआरपी निर्भया व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन क्रमांक ९८३३३१२२२२ किंवा २३७५९२८३ या नियंत्रण कक्षावर संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.