नुपूर शर्मांच्या निषेधाची 'आग' देशभर पसरली, नवी मुंबई-सोलापूरमध्येही निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:32 IST2022-06-10T17:02:52+5:302022-06-10T18:32:43+5:30
Nupur Sharma : विशेष म्हणजे शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली.

नुपूर शर्मांच्या निषेधाची 'आग' देशभर पसरली, नवी मुंबई-सोलापूरमध्येही निदर्शने
देशभरात नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात आंदोलनाची आग पसरत चालली आहे. दिल्लीनंतरनवी मुंबईत नुपूर शर्मा यांच्याविरोधात जोरदार निदर्शने होत आहेत. नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी (Arrest) हे निदर्शने करण्यात येत आहे. याठिकाणी महिलाही मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. सोलापूरसह (Solapur) नवी मुंबईतही (Navi mumnai) आंदोलने केली जात आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली. यानंतर अनेक ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे.
भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजही नमाजानंतर दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशच्या काही शहरांमध्ये सुरक्षा दलावर मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली.
नुपूर शर्मांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होत असताना पनवेल मधील मुस्लिम बांधवानी दि.10 रोजी रस्त्यावर उतरून शर्मा यांचा निषेध केला.नमाजानंतर पनवेल मधील विविध मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले.