शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या पूर्वसंध्येला पदोन्नती

By admin | Updated: June 1, 2015 02:42 IST

सेवानिवृत्तीला अवघा एक दिवस शिल्लक असताना सहा पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर बढती दिली गेली. एक दिवसाच्या या बढती प्रकरणाने पोलीस महासंचालक

राजेश निस्ताने, यवतमाळसेवानिवृत्तीला अवघा एक दिवस शिल्लक असताना सहा पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर बढती दिली गेली. एक दिवसाच्या या बढती प्रकरणाने पोलीस महासंचालक कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील शेकडो पोलीस अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. फौजदार पदापासून अपर पोलीस अधीक्षकांपर्यंत हीच अवस्था आहे. या बढतीच्या प्रतीक्षेत तर कित्येक पोलीस अधिकारी सेवानिवृत्तही झाले आहेत. ३० मे रोजी सहा पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलीस उपअधीक्षक बनविण्यात आले. त्यामध्ये खंडेराव विधाते (बृहन्मुंबई) देविदास सोनावणे (धुळे), पंढरीनाथ पाचपुते (नवी मुंबई), संपत कदम (दौंड पुणे), धर्मराज ओंबासे (नांदेड), रामचंद्र बरकडे (बृहन्मुंबई) यांचा समावेश आहे. विशेष असे, दुसऱ्याच दिवशी (३१ मे) रोजी हे सहाही अधिकारी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त झाले. सन २०१५ मध्ये २१० पोलीस निरीक्षक सेवानिवृत होणार आहेत. त्यातील निरिक्षकांसह अन्य शेकडो पोलीस अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र यातील कित्येकांची सेवानिवृत्ती अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे त्यांनाही वेळेपूर्वी शासन बढती देणार की अवघ्या एक दिवसासाठी वरिष्ठ बनविणार याकडे लक्ष लागले आहे. महसूल व अन्य खात्यांमध्ये वेळेत बढती दिली जात असताना २४ तास राबणाऱ्या पोलिसांवरच हा अन्याय का, असा प्रश्न पोलीसांना पडला आहे.