शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

अजित पवार दिलेला शब्द पाळतो; पण हर्षवर्धन पाटलांना जायचंच होतं..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 4:57 PM

'तीन पिढ्या सरकारमध्ये असताना आणि मंत्रिपद देऊनही काही लोक पक्ष सोडून जात आहेत,'

ठळक मुद्देआम्ही हर्षवर्धन पाटील यांना  ५० ते ५५ फोन केले पण ते भेटले नाहीत.

सोमेश्वरनगर: अजित पवार एकदा दिलेला शब्द पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी तो पाळतो. हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता. पण त्यांचे आधीचं ठरलं होतं. त्यांना जायचंच होतं, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विज्ञान महाविद्यालय, मुलींच्या वसतिगृह भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, आम्ही हर्षवर्धन पाटील यांना  ५० ते ५५ फोन केले पण ते भेटले नाहीत. सांगायला काही नाही म्हणून ते आता राष्ट्रवादीवर आरोप करत आहेत, मी स्वत: कित्तेक वेळा त्यांना पुण्याच्या घरी भेटायला गेलो. पण सध्या ते फक्त पावती फेडायचे काम करत आहेत.  पवार म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून राष्ट्रवाद चा मुद्दा पुढे केला जात आहे. ३७० बद्दल बोलले जातेय. पण कंपन्या बंद पडत आहेत, समाजातील प्रत्येक घटक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं जात नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी मिळत नाही. लोकांना भावनिक बनवलं जातेय. काहींना भीती दाखवून तर काहींना नोटिसा पाठवून पक्षात घेतलं जातेय. त्यांना सत्तेचा माज, सत्तेची नशा चढली आहे. 

ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे बोलायचे कमी झाले : पवार'सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकशांची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून तेही बोलायचे कमी झाले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस