शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू शोधप्रक्रियेला गती

By admin | Updated: March 19, 2015 23:59 IST

निवड प्रक्रियेला प्रारंभ : अंतिम मुदत २० एप्रिल; त्रिसदस्यीय समितीचे आवाहन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय शोधसमितीने इच्छुक अर्हता असलेल्यांना अर्ज पाठविण्याचे आवाहन केले आहे. अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत २० एप्रिल आहे.गेल्या आठवड्यात राजभवनातून विद्यापीठ कुलगुरू शोधसमितीच्या अध्यक्षपदाची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली. समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन हे असून, त्यांच्यासह उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे आणि विद्यापीठ प्रतिनिधी रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांचा समितीत समावेश आहे. समिती अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर अनेक इच्छुकांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या जाहिरातीची प्रसिद्धी समितीने बुधवारी केली. त्यात राज्य सरकारने २७ मे २००९ मध्ये कुलगुरूपदासाठी निश्चित केलेल्या अर्हता आणि अनुभव या अटींची पूर्तता करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांकडून नामनिर्देशन अथवा निवेदने पाठविण्याचे आवाहन समितीने केले आहे. अर्हता आणि सविस्तर तपशील, अर्जाचा नमुना (६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्तींनी स्वत:चा तपशीलवार, गोषवारा, उमेदवारीचे दोन पानी समर्थन, विद्यापीठासाठी दोन पानी भविष्यलक्षी योजना आणि स्वत:च्या कामांची ओळख असलेल्या तीन नामवंत व्यक्तींचे संदर्भ, नाव आणि पत्त्यांसहित सादर करावेत. संस्थांनाही योग्य उमेदवारांची नावे पाठविण्याची परवानगी असणार आहे. शोधसमितीने डॉ. बी. चंद्रशेखर यांना संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. (प्रतिनिधी)इच्छुक लागले तयारीलातत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची मुदत संपण्यापूर्वीच दोन महिन्यांपासून कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या प्राचार्य, प्राध्यापकांनी तयारीला सुरुवात केली. मागीलवेळी असलेले निकष, पात्रता, आदींनुसार अर्ज, बायोडाटा, व्हीजन तयार केले आहे. आता शोधसमितीकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्याने संबंधित इच्छुक अर्ज ‘अपडेट’ करण्याच्या तयारीला लागले आहेत.अर्ज पाठविण्याचा पत्तासंपर्क अधिकारी डॉ. बी. चंद्रशेखर यांच्याकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज चार प्रतीत, तसेच त्याची संगणकीकृत प्रत (ुूँंल्ल१िं२ी‘ं१@१ूु.१ी२.्रल्ल) २० एप्रिलला अथवा त्यापूर्वी पोहोचेल, अशारीतीने कुलसचिव, रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, एन.सी.आर. बायोटेक सायन्स क्लस्टर, ३ माईलस्टोन, फरिदाबाद-गुरगाव एक्स्प्रेस वे, पोस्ट आॅफिस बॉक्स ३, फरिदाबाद-१२१००१, हरियाणा या पत्त्यावर पाठवावेत. या मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती समितीने दिली आहे.