शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन चिघळण्यास प्राध्यापकही जबाबदार

By admin | Updated: October 4, 2015 02:07 IST

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विद्यार्थीच

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विद्यार्थीच जबाबदार असून प्राध्यापकांनी वेळावेळी आपली भूमिका बदलली तसेच जबाबदारीचे भान न ठेवता आंदोलनाला हवा दिली, असा ठपका केंद्र सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने ठेवला आहे.एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन १२ जूनपासून सुरू असून या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने रजिस्ट्रार आॅफ न्यूजपेपर एस. एम. खान यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती नेमली होती. २००८ तुकडीचा बॅकलॉग राहण्यात विद्यार्थीच दोषी असल्याचे समितीने म्हटले आहे.एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला होता, त्यावेळचे फूटेज पाहिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार का दिली याची कल्पना येते. त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण होता. त्यामुळेच त्यांनी पोलिसांत तक्रार केली, असे नमूद करत, एफआयआर मागे घेण्याची मागणी विद्यार्थी करत असतील तरी कायद्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण व्हावी, असेही समितीने म्हटले आहे. एफटीआयआयमधीलच माजी विद्यार्थी असलेल्या काही प्राध्यापकांकडून तसेच येथे वारंवार भेट देणाऱ्या अतिथी प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न केला गेला. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा, यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, असे निरीक्षणही समितीने नोंदविले आहे. काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून अयोग्य पद्धतीचे वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, या अहवालातून वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत पाठराबे यांनी दिली.