कैद्यांकडेच तुरुंगाची रखवाली!

By Admin | Updated: April 7, 2015 01:49 IST2015-04-07T01:49:51+5:302015-04-07T01:49:51+5:30

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; राज्यातील ४१२ कैदी बनले पहारेकरी.

Prisoners only prison guard! | कैद्यांकडेच तुरुंगाची रखवाली!

कैद्यांकडेच तुरुंगाची रखवाली!

नीलेश शहाकार/बुलडाणा : राज्यातील अनेक खुल्या व जिल्हा कारागृहात सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून कैद्यांची नियुक्ती करण्यात येत असून, सध्या विविध कारागृहांत ४१२ कैदी पहारेकरी म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून जाण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचे हे वास्तव समोर आले आहे. कारागृहांमध्ये कैद्यांना विविध व्यवसायाभिमुख उद्योगांत गुंतविण्यात येते. तर ज्या कैद्यांना अक्षरओळख नसते त्यांना कारागृहात रात्र-पहारेकरी, स्वच्छता, कारागृह दुरुस्ती, स्वयंपाक अशी कामे सोपवण्यात येतात. या विविध कामांसाठी राज्या तील मध्यवर्ती, खुल्या आणि जिल्हा अशा ४७ कारागृहात सध्या १५५८ कैद्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी प्रत्येक कारागृहात पोलिस कर्मचारी तैनात असतात. मात्र, कारागृहात असणार्‍या ज्या सेल (वार्ड) मध्ये सदोष कैद्यांना ठेवले जाते, त्या विस्तारीत वार्डाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पहारेकरी म्हणून ज्येष्ठ कैद्याची नियुक्ती करण्यात येते. मात्र, या कैदी पहारेदारांची विश्‍वनियता संपुष्टात आली तर कारागृहांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

*कैद्याचा मुक्त वावर विविध कारागृहात बंदी अन्वेक्षक म्हणून ४२७ कैदी, स्वच्छता व झाडूवाले म्हणून ७१९ पुरुष, महिला कैदी कार्यरत आहे. तर रात्रीचे पहारेकरी म्हणून ४१२ कैदी काम करीत आहेत. या पहारेकरी कैद्यांचा कारागृहात नेहमीच मुक्त वावर असतो.

*मध्यवर्ती कारागृह        रात्रीचे पहारेकरी कैदी

येरवडा ७६

कोल्हापूर                        ७२

ठाणे                               0७

औरंगाबाद                       ३९

नाशिकरोड                       ८३

नागपूर                            ७१

अमरावती                        ४२

तळोजा                           0४

जिल्हा कारागृह               रात्रीचे पहारेकरी कैदी

अकोला                            ५

भंडारा                              १

चंद्रपूर                              ४

यवतमाळ                        ४

वर्धा                                ४

Web Title: Prisoners only prison guard!