शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या गुरांना महाराष्ट्रात बंदी

By admin | Updated: February 10, 2015 02:33 IST

महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी

मुंबई : महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी घालताना गुजरात राज्यातून काठेवाडी समाजासोबत येणाऱ्या गुरांवर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू झाली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, राज्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यात परिस्थिती दिवसागणिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुजरातमधून दरवर्षी लक्षावधी गुरेढोरे चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रात येतात. यंदा उन्हाळ््यात महाराष्ट्रात चाऱ्याची टंचाई जाणवेल अशी स्थिती असल्याने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याची आकडेवारी समोर आल्याने खात्याचे प्रधान सचिव व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांना या समस्येचे मूळ शोधण्यास सांगितले होते. महसूल खात्यातील ७० टक्के भ्रष्टाचार तलाठी व सर्कल स्तरावर होत असल्याचे आढळून आले. सातबाराचे उतारे देताना किंवा नोंदीची फेरफार करताना भ्रष्टाचार होत असल्याने सातबारा उतारे सही-शिक्क्यासह आॅनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. नोंदींच्या फेरफारीकरिता इ-फेरफार करण्याची योजना लागू केली असून लवकरच ती ९० टक्के तालुक्यांत अमलात आणली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. यामुळे येत्या काही दिवसांत महसूल खात्यामधील भ्रष्टाचार आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खात्यामधील बदल्याचे अधिकार विकेंद्रीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)