शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा सुपरफास्ट दौरा

By admin | Updated: August 19, 2014 01:01 IST

जिल्हा प्रशासन, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस यंत्रणेसह संपूर्ण नागपूरकरांचे गेल्या आठवड्यापासून ज्याकडे लक्ष लागले होते तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ आॅगस्टचा नागपूर दौऱ्याचा अधिकृत

प्रतीक्षा संपली : चार तासांत दोन कार्यक्रम नागपूर : जिल्हा प्रशासन, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस यंत्रणेसह संपूर्ण नागपूरकरांचे गेल्या आठवड्यापासून ज्याकडे लक्ष लागले होते तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ आॅगस्टचा नागपूर दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे मोदी येणार हे निश्चित झाले असून, मंगळवारपासून प्रशासकीय आणि भाजपच्या पातळीवर तयारीला वेग येणार आहे.पंतप्रधान नागपूरला येणार हे एनटीपीसी मौदा यांना आलेल्या पत्रामुळे उघड झाले. त्यानंतर त्यांचा नागपूरसह देवळीलाही कार्यक्रम होईल, असे भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत सांगण्यात आले. दौरा प्राप्त न झाल्याने पोलीस आणि जिल्हा प्रशासनही तयारीच्या कामाला लागू शकत नव्हते. काही दिवस वाट पाहिल्यावर प्रशासनाने प्राथमिक तयारीला सुरुवात केली; तरी रोज दौऱ्याच्या कार्यक्रमाची वाट पाहणे सुरूच होते. दरम्यान, मोदी यांचा देवळी दौरा रद्द झाल्याची बातमी आली. त्यामुळे दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम केव्हा येतो, याकडेच डोळे लागले होते. प्रशासनाकडे यासंदर्भात रोज विचारणा करण्यात येत होती. सोमवारी दुपारी अखेर दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबतची अनिश्चितता संपली. प्राप्त दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २१ आॅगस्टला दुपारी ३.०५ मिनिटांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रांची येथून वायुदलाच्या विमानाने आगमन होईल. दुपारी ३.१० वाजता ते तेथूनच हेलिकॉप्टरने मौद्याकडे रवाना होतील. ३.३५ वाजता त्यांचे मौदा येथे आगमन होईल. तेथे त्यांच्या हस्ते एनटीपीसीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. ५ वाजता ते मौद्याहून नागपूर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. ७.२५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन आणि तेथून वाहनाने ते ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर पोहोचतील. ५.४५ ते ६.४५ या दरम्यान ते येथे आयोजित मेट्रो रेल्वे प्रकल्प, पारडी नाका उड्डाण पुलासह इतरही विविध विकास कामांचे भूमिपूजन करतील. त्यानंतर ते विमानतळाकडे रवाना होतील. रात्री ७.१० वाजता दिल्लीकडे प्रयाण करतील. सध्या तरी मोदींच्या दौऱ्यात संघ मुख्यालय, स्मृतिमंदिर वा इतर स्थळांना भेटीचा समावेश नाही. चार तासांचा त्यांचा दौरा आहे. त्यात वेळेपर्यंत बदल अपेक्षित आहेत. (प्रतिनिधी)असा आहे दौैरावेळ कार्यक्रमदु.३.०५ रांची येथून नागपूर विमानतळावर आगमन३.१० हेलिकॉप्टरने मौद्याकडे प्रयाण३.३५ मौदा हेलिपॅडवर आगमन३.४ ५ते ४.४५ मौदा औष्णिक वीज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे देशाला लोकार्पण५ वा. मौदा येथून नागपूरकडे प्रयाण५.२५ नागपूर विमानतळावर आगमन५.३० कस्तूरचंद पार्ककडे कारने रवाना५.४५ कस्तूरचंद पार्कवर आगमन५.४५ ते ६.४५कस्तूरचंद पार्कवरील कार्यक्रमात उपस्थितीरात्री ७.१० नागपूरहून दिल्लीकडे प्रयाण