पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:50 IST2025-03-30T06:57:59+5:302025-03-30T08:50:27+5:30
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाईल. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.