शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कर्मचार्‍यांना पूर्वीचेच वेतन

By admin | Updated: June 19, 2014 22:14 IST

जिल्ह्यातील बहुतांश ग्रा.पं.ची करवसुली ९0 टक्केपेक्षा कमी असल्याने सर्वच ग्रा.पं.चे कर्मचारी या श्रेणीबद्ध वेतनापासून वंचित आहेत.

वाशिम : राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना गावाची लोकसंख्या व ग्रामपंचायतला मिळणार्‍या वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर ङ्म्रेणीबद्ध वेतन देण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार जिल्हय़ातील ४९३ ग्रामपंचायतींच्या ७0९ कर्मचार्‍यांना श्रेणीबद्ध वेतनासाठी अनुदान दिले जाणार होते; परंतु हे अनुदान ९0 टक्केपेक्षा जास्त करवसुली करणार्‍या ग्रा.पं.ना दिले जाण्याचा निकष घातला असल्याने व जिल्ह्यातील बहुतांश ग्रा.पं.ची करवसुली ९0 टक्केपेक्षा कमी असल्याने सर्वच ग्रा.पं.चे कर्मचारी या श्रेणीबद्ध वेतनापासून वंचित आहेत.

पूर्वी ग्रामपंचायतीची घरपट्टी व अन्य करवसुली समाधानकारक होत नसल्याने व ग्रामपंचायतींना राज्यशासनाकडून ग्रा.पं.कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या ५0 टक्के वेतनाएवढा प्रोत्साहन निधी अनुदान म्हणून दिला जात असल्याने ग्रा.पं.कर्मचार्‍यांना तुटपुंजे वेतन मिळत होते. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या युनियनने राज्य शासनाकडे वेळोवेळी वेतनङ्म्रेणी लागू करण्याची मागणी केली. त्यासाठी लढा दिला. त्यानंतर राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसाठी लोकसंख्या व वार्षिक उत्पन्ननिहाय आकृतीबंध लागू केला.त्यानुसार एक ते पाच हजार लोकसंख्या व दोन लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या किमान मूळ वेतनाच्या १00 टक्के एवढी रक्कम अनुदानादाखल राज्यशासनाकडून १ एप्रिलपासून दिली जाणार होती. पाच ते दहा हजार लोकसंख्या व वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न आणि दहा हजारापर्यंत लोकसंख्या व पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या किमान मूळ वेतनाच्या ७५ टक्के एवढी रक्कम अनुदानादाखल दिली जाणार होती; तसेच दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्या व पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या किमान मूळ वेतनाच्या ५0 टक्के एवढी रक्कम अनुदानादाखल दिली जाणार होती.कत्यामुळे जिल्हय़ातील ७0९ ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नव्या या आकृतीबंधानुसार नव्या आर्थिक वर्षापासून ङ्म्रेणीबद्ध वेतन मिळणार, असे वाटत होते; परंतु यासाठी ९0 टक्केपेक्षा जास्त करवसुलीची अट घालण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची करवसुली ही ९0 टक्केपेक्षा कमी आहे. यामुळे श्रेणीबद्ध वेतनापासून जिल्ह्यातील सर्वच ग्रा.पं.चे कर्मचारी वंचित आहेत.