शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

दुपारच्या डुलकीने होतो अनेक रोगांपासून बचाव

By admin | Updated: May 26, 2017 01:03 IST

वामकुक्षी (दुपारी डुलकी घेणे) आरोग्यासाठी लाभदायक असते, असे आयुर्वेदाने खूप आधीच सांगितले होते. आधुनिक विज्ञानानेही आता यावर शिक्कामोर्तब केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वामकुक्षी (दुपारी डुलकी घेणे) आरोग्यासाठी लाभदायक असते, असे आयुर्वेदाने खूप आधीच सांगितले होते. आधुनिक विज्ञानानेही आता यावर शिक्कामोर्तब केले आहे.नवे संशोधन हॉर्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थने केले. दुपारी अर्धा तासाची झोप किंवा डुलकी घेतली तर अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो, असे यात आढळून आले आहे. वामकुक्षी घेणाऱ्यांचा मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि अधिक क्षमतेने काम करतो. वामकुक्षीमुळे सामान्य व्यक्तींत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३३ टक्क्यांनी कमी होते. नोकरदारांसाठी तर दुपारची डुलकी अधिक लाभदायक असते. डुलकीमुळे त्यांच्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ६४ टक्क्यांनी कमी होते, असे संशोधकांना आढळले. दुपारच्या डुलकीबाबत चीनमध्येही एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात ६५ वर्षांहून अधिक वयाच्या ३ हजार लोकांना सामील करण्यात आले होते. ज्या ज्येष्ठांनी वामकुक्षी घेतली होती त्यांनी गणिते अधिक चांगल्या प्रकारे आणि सहजपणे सोडविली तर दुपारी डुलकी न घेणारे गणिते सोडविण्यात मागे पडले. वामकुक्षीला इंग्रजीत सिएस्टा असे म्हणतात हा शब्द स्पॅनिशमधून इंग्रजीत आला आहे. दुपारी झोपच घेतलीच पाहिजे, असे नाही; परंतु कामातून थोडी उसंत आवश्यक आहे. थोडा आराम गरजेचा आहे. जे लोक दुपारी काही काळ आराम करतात किंवा डुलकी घेतात त्यांची तणाव पातळी (स्ट्रेस लेव्हल) कमी असते. तणावामुळे वाढणाऱ्या हार्मोन्सची पातळीही वामकुक्षीने कमी होते. दुपारी आराम करणे निश्चितच लाभदायक आहे. -डॉ. जय देशमुखवरिष्ठ चिकित्सकवामकुक्षीचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयालाही याचा लाभ होतो. तुम्ही दुपारी थोडावेळ आराम केला तर शरीराच्या संपूर्ण कार्यप्रणालीला आराम मिळतो. ही गोष्ट आरोग्याच्या द्दृष्टीने निश्चितच हितकारक आहे. -डॉ. जसपाल अनरेजाहृदयरोगतज्ज्ञ