मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांना उल्लेखनीय सेवेबददल राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. त्यांच्यासोबत हा मान हिंगोलीतील बालपूर पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक जोंधळे यांना मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहविभागाने देशभरातील तब्बल ८२४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली. त्यापैकी महाराष्ट्रातून फणसाळकर, जोंधळे यांच्यासह अन्य ३६ पोलिसांना गुणवत्ता पूर्वक सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले. त्यात मुंबईतील गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मनोहर धनावडेंसह नऊ जणांचा सहभाग आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}