शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवट की काळजीवाहू सरकार?

By admin | Updated: September 27, 2014 05:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला. विधानसभा निवडणुकीला उणेपुरे २० दिवस बाकी असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की, काळजीवाहू सरकारला काम पाहू द्यायचे, यावर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले आहे.राष्ट्रवादीने काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रीच राजभवनावर जाऊन राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी ८.३०ला राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. सरकार अल्पमतात आले असल्याने आपण राजीनामा देऊ इच्छितो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी त्या वेळीच व्यक्त केली, असे सूत्रांनी सांगितले. तर राज्य सरकार अल्पमतात आले असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांकडे केली. या घटनाक्रमानंतर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले. तसेच दुपारी ३च्या सुमारास महाधिवक्ता दरियास खंबाटा यांना राजभवनावर पाचारण केले. उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत त्यांनी कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या.नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायची की, सध्याच्या सरकारला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगायचे, याबाबतचा निर्णय राज्यपाल उद्यापर्यंत घेतील. (विशेष प्रतिनिधी)