Premature blow to the state, order of grapes, panchanama of mangoes | राज्याला अवकाळीचा फटका, द्राक्षबागा, आंब्याचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश

राज्याला अवकाळीचा फटका, द्राक्षबागा, आंब्याचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश

मुंबई/नागपूर/जळगाव/औरंगाबाद -  संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह खानदेशला मंगळवारी अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला असून शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. उतरणीला आलेल्या द्राक्षबागासह केळी व आंबा पिकाला फटका बसला असून ज्वारी, गव्हू ही उभी पिकेही जमीनदोस्त झाली. हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खान्देशातील नुकसानीची पाहणी केली असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
मराठवाड्यात गारपीट
मराठवाड्याला मार्च महिन्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका बसला असून, त्याचा परिणाम रबी हंगामातील हाताशी आलेल्या पिकांवर झाला आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत काही ठिकाणी गारपीटही झाली. औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात अवकाळी पाऊस कमी-अधिक प्रमाणात बरसला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विभागातील ५४ मंडळांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही गावांत गारपीटही झाली होती. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्ष व आंब्याला बसला आहे. हाती आलेला गहू अडवा झाला आहे. विभागात अवकाळी पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने भाकीत केले आहे. त्यामुळे पिके उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले होते. गहू, हरभरा, ज्वारी काढणीला आलेली असताना पावसाने त्या पिकांचे नुकसान केले. पीक विमा अर्ज ४८ तासात भरा ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांनी तातडीने नुकसानीबाबत विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरुन ४८ तासांच्या आत विमा कंपनीकडे अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकºयांना केले.

विदर्भात धानाचे नुकसान
विदभातील गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारच्या मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुन्हा एकदा धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांच्या धानाची दाणादाण उडाली. नागरी पुरवठा मंत्रालयाकडून इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवठा करण्याचा आदेश गडचिरोलीच्या पुरवठा विभागाला मिळाला नसल्यामुळे धान भरडाई बंद असून त्यामुळे अनेक खरेदी केंद्रांवर धान उघड्यावर पडून आहे.

खान्देशात केळीचे नुकसान
जळगाव : धुळे व जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावातील केळी, गहू, मका, बाजरी, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विजेचे खांब, वृक्ष उन्मळून पडले असून जनावरेही दगावली. दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आणि या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

गारपिटीची आणखी शक्यता
छत्तीसगड आणि सभोवताली ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पूर्व विदर्भ ते तामिळनाडू द्रोणिय स्थिती आहे. त्यामुळे विदर्भात २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. शेतकºयांनी कळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

Web Title: Premature blow to the state, order of grapes, panchanama of mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.