शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वीजसंकट कायम!

By admin | Updated: June 4, 2014 01:12 IST

राज्यातील तीन खाजगी वीज कंपन्यांच्या वीज उत्पादन संचात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने निर्माण झालेले वीजसंकट अद्यापही दूर करण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना

१२00 मेगावॅट : केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून घेणारनागपूर : राज्यातील तीन खाजगी वीज कंपन्यांच्या वीज उत्पादन संचात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने निर्माण झालेले  वीजसंकट अद्यापही दूर करण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा काही दिवस भरनियमनाचा सामना  करावा लागू शकतो. त्याच वेळी महावितरण मात्र उद्यापर्यंंंंत (बुधवार) सद्यस्थितीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त करीत आहे.  या वीजसंकटामुळे नागरिकांना गत दोन दिवसांपासून भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. माहिती सूत्रानुसार,  राज्यातील अदानी वीज प्रकल्पासह इंडिया बुल्स व जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपन्यांच्या काही संचांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते  बंद पडले आहे. त्यामुळे सुमारे ३ हजार मेगावॅट वीज उत्पादन ठप्प झाले आहे. महावितरण विजेचा हा तुटवडा भरून  काढण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून वीज खरेदी करीत आहे. त्यानुसार उद्यासाठी (बुधवार) १२00 मेगावॅट वीज घेण्यात  येणार आहे. शिवाय अदानी प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा बंद पडलेला संच ५ जूनपर्यंंंंत पूर्ववत सुरू होण्याची शक्यता वर्तविली  जात आहे. तसेच जेएसडब्ल्यूचा ३00 मेगावॅटचा संच यापूर्वीच सुरू झाला आहे. गत १ जून रोजी अदानीचे ६६0 मेगावॅटचे दोन  संच व इंडिया बुल्सचे २७५ मेगावॅटचे दोन संच अचानक बंद झाले होते. त्यापैकी या दोन्ही कंपन्यांचे प्रत्येकी एक संच पूर्ववत सुरू  झाले असून, अदानीचा दुसरा संच ५ जून रोजी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)