गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोना महासाथीचा प्रादुर्भव सुरू झाला होता तेव्हापेक्षाही अधिक रुग्णांची नोंद दररोज आहे. दरम्यान अनेक क्षेत्रांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसंच शिक्षण क्षेत्रालाही या मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून अनेकांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.“सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटसोबत MPSC आणि MHUEXAM असा हॅशटॅगही वापरला आहे.
Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 10:03 IST
Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी केली मागणी, राज्यात सध्या लावण्यात आले आहेत कडक निर्बंध.
Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी केली मागणीराज्यात सध्या लावण्यात आले आहेत कडक निर्बंध.