अनिल देशमुखांविरोधात सोशल मिडीयावर पोस्ट, भाजप प्रवक्त्याविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 11:26 IST2020-04-14T11:25:45+5:302020-04-14T11:26:17+5:30
नागपूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांच्या तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल झाला.

अनिल देशमुखांविरोधात सोशल मिडीयावर पोस्ट, भाजप प्रवक्त्याविरोधात गुन्हा
नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बद्दल बदनामीकारक फेसबुक पोस्ट लिहील्याप्रकरणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या विरोधात पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणच्या कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
जिल्हा नागपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांच्या तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल झाला. कुलकर्णी यांनी फेसबुकवर गृहमंत्र्यांविरोधात बदनामीकारक मजकूर लिहिला आहे. त्यामुळे राज्याची बदनामी तर झाली आहेच. शिवाय गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेस ठेच पोहोचली आहे, अशी तक्रारदाराने भूमिका मांडली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.