शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणुकीची शक्यता - चव्हाण

By admin | Updated: April 8, 2015 02:18 IST

गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे.

मुंबई : गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे. त्यामुळे आपापसांतील मतभेदामुळे ते कोसळून केव्हाही मुदतपूर्व विधानसभा निवडणूक लागू शकते, असे भाकित वर्तवून वांद्रे (प.) पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन कॉंग्रेसच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षासाठी पूर्ण वेळ देत पुनर्बांधणी करण्याचे आपण ठरवले आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी संघटनात्मक बदलाची गरज आहे, तेथे योग्य व सक्षम कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. त्यासाठी आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. त्या जिल्ह्णात जाऊन तेथील पक्षाची परिस्थिती, कार्यकर्त्यांची मते आजमाविली जातील. चार महिन्यांत त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ते बदल केले जातील. ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवित केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाचे खरे रूप जनतेला कळू लागले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या १० महिन्यांत एकही निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा झालेला नाही. त्यामुळे सरकारविषयी नाराजी वाढत आहे, असा दावाही त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसबाबत ते म्हणाले, सध्या ते द्विधा मन:स्थितीत आहेत. कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात भूमिका घेतात, त्यामागची नेमकी कारणे त्यांनाच माहीत असतील. नवी मुंबई, औरंगाबादमध्ये तर राष्ट्रवादीशी आघाडी न करता आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहोत.