Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोड यांच्या गंभीर आरोपावर पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण म्हणाले...

By प्रविण मरगळे | Published: March 1, 2021 05:47 PM2021-03-01T17:47:37+5:302021-03-01T17:53:21+5:30

Pooja Chavan's Father Reaction on Shantabai Rathod allegation of Sanjay Rathod given 5 Crore to family: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोमवारी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पुढे येऊन धक्कादायक आरोप केले

Pooja Chavan Suicide Case: On Shantabai Rathod allegation, father Lahu Chavan clarification | Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोड यांच्या गंभीर आरोपावर पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण म्हणाले...

Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोड यांच्या गंभीर आरोपावर पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देपूजा चव्हाणच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याने ते या प्रकरणातही काहीही बोलणार नाहीतपूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांचे कुटुंबीयांवर गंभीर आरोप पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोडांचे आरोप फेटाळले

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अडचणीत आलेल्या शिवसेना नेते संजय राठोड(Sanjay Rathod) यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत, पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र दिलं, या पत्रात संजय राठोड यांचा बळी देऊ नका असा उल्लेख करण्यात आला होता, मुख्यमंत्र्यांनीही हे पत्र पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं होतं, विरोधक या प्रकरणी दुर्दैवी राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. (Pooja Chavan's father Lahu Chavan denied Shantabai Rathod allegations that Sanjay Rathod given 5 crore to Pooja Family)

यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोमवारी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पुढे येऊन धक्कादायक आरोप केले, पूजा चव्हाणच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याने ते या प्रकरणातही काहीही बोलणार नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला, मात्र आता हे आरोप पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी फेटाळून लावले आहेत, टीव्ही ९ च्या वृत्तानुसार पूजाच्या वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून कुठलेही पैसे न घेतल्याचं सांगितले आहे.

पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वाचा जसंच्या तसं...

या आरोपावर लहू चव्हाण म्हणाले की, पूजाच्या मृत्यूबाबत कोण काय बोलतंय ते माहिती नाही, आम्ही आमच्या दु:खात आहोत, शांताबाई या आमच्या लांबच्या नातेवाईक आहेत परंतु त्यांच्यासोबत कसलेच नातेसंबंध नाहीत असं सांगत या आरोपावर जास्त काही बोलण्यास नकार दिला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पूजा प्रकरणात होणारी बदनामी थांबवण्याची विनंती केली परंतु अद्याप बदनामी थांबली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

त्याचसोबत मी आता थकलोय, कृपया आतातरी बदनामी थांबवा अशी आर्त विनवणी लहू चव्हाण यांनी विरोधकांना करत पूजा ही तुमच्या लेकीसारखी असून तिला न्याय द्या पण बदनाम करू नका, राजीनाम्यानंतर संजय राठोड यांना भेटलो नाही, संशयावरून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती, तसेच या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिल्याचं लहू चव्हाण म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या शांताबाई राठोड?

अरुण राठोड माझ्या गावातला मुलगा आहे. माझ्या माहेरचा नातलग आहे. तो माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. अरुण राठोड हा पूजा चव्हाणचा कुणीच नाही. तसेच अरुणच्या विरोधात आमची काहीही तक्रार नाही. पूजाच्या आई वडिलांनी या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड यांनी केला. पूजाच्या आईवडलांनी पाच कोटी रुपये घेतले आहेत. त्यामुळे ते या प्रकरणावर बोलणार नाहीत. तसेच न्यायाची मागणी करणार नाहीत. मात्र मी न्यायासाठी लढत राहणार, असे पूजाची आजी म्हणाली. तसेच पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये संजय राठोड यांनीच दिले. तसेच याबाबतचे पुरावे वेळ आल्यावर देईन, असेही त्यांनी सांगितले.

पूजाच्या आईवडिलांनी पत्रात काय म्हटलं?

आमची मुलगी गमावली परंतु या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीव राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये आमच्या आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्या असं पत्र पूजाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं होतं.       

Read in English

Web Title: Pooja Chavan Suicide Case: On Shantabai Rathod allegation, father Lahu Chavan clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.