Pooja Chavan Suicide Case: family letter to CM Uddhav Thackeray incuding name of Sanjay Rathod | Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वाचा जसंच्या तसं...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वाचा जसंच्या तसं...

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे, संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे, यावेळी अनिल परब आणि अनिल देसाई हे उपस्थित होते, संजय राठोडांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पहिल्याच मंत्र्याची विकेट गेली आहे. मात्र यावरून आता सत्ताधारीही विरोधकांवर आक्रमक झाले आहेत.(Pooja Chavan Family Met CM Uddhav Thackeray Wrote letter on Politics behind Suicide Case & Sanjay Rathod)  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी भेट घेतली, यात आईवडील, बहिण उपस्थित होती, पूजाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी देऊ नका असं विनंती पत्राद्वारे केली आहे, याच पत्राच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष भाजपावर निशाणा साधला आहे.

...अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

वाचा हे संपूर्ण पत्र जसं आहे तसंच...

माननीय मुख्यमंत्री महोदय

महाराष्ट्र राज्य

विषय: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवणेबाबत

महोदय,

आमची मुलगी पूजा चव्हाण हिचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला कुठल्याही माता-पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्य मंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहेत.

आपण या संदर्भात पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतु या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीव राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये आमच्या आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्या

आपले नम्र

लहू चंदू चव्हाण (वडील)

मंदोधरी लहू चव्हाण (आई)

दिव्यानी लहू चव्हाण (बहीण)

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pooja Chavan Suicide Case: family letter to CM Uddhav Thackeray incuding name of Sanjay Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.