Pooja Chavan Suicide Case:...अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

By प्रविण मरगळे | Published: February 28, 2021 07:35 PM2021-02-28T19:35:27+5:302021-02-28T19:38:32+5:30

CM Uddhav Thackeray Target BJP Over Pooja Chavan Suicide Case politics: कालबद्ध तपास करा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाही, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे

Pooja Chavan Suicide Case:CM Uddhav Thackeray Target BJP over Sanjay Rathod Resignation | Pooja Chavan Suicide Case:...अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

Pooja Chavan Suicide Case:...अन् पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्र वाचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपावर शरसंधान

Next
ठळक मुद्देपोलीस यंत्रणांवर अविश्वास दाखवत असाल तर आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकारकालबद्ध तपास करा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाहीमोहन डेलकरांची बाजू कुणीही मांडत नाही, त्यांच्या आत्महत्येबद्दल कुणीच बोलत नाही

मुंबई  - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे, या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात रान उठवलं होतं, पण राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपावर जोरदार शरसंधान साधलं आहे. (CM Uddhav Thackeray Criticized BJP Over Sanjay Rathod & Pooja Chavan Suicide Case politics)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार चालवताना न्यायाने वागावं ही आमची जबाबदारी आहे. तपास झालाच पाहिजे, परंतु गेल्या काही दिवसांत गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे, चौकशीत दोषी असेल तर कोणी कितीही मोठा असेल तर शिक्षा होणारच आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल असा न्याय नको, वर्षभरापासून आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, अशा घटना घडत आहेत असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, इतके दिवस का लावले असा विचार करत असाल तर ज्या क्षणी ही घटना घडली, तेव्हा आमच्या सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कालबद्ध तपास करा आणि अहवाल द्या, त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणालाही पाठिशी घालणार नाही, संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे, परंतु हे सगळं सुरू असताना आदळआपट करून तपास यंत्रणेवर दबाव टाकणं हे योग्य नाही, तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवला जातोय, महाराष्ट्र पोलिसांवर विरोधकांचा अविश्वास आहे. पोलीस यंत्रणांवर अविश्वास दाखवत असाल तर आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचसोबत संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाणचे आईवडिल आणि बहिण मला येऊन भेटले, त्यांच्या अश्रू आणि भावना काय आहेत मी समजू शकतो, त्यांनी मला एक पत्र दिलंय ते मी ऐकून दाखवतो, या पत्रात त्यांनी म्हटलंय की, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पोलीस चौकशीचे आदेश तुम्ही दिलेत, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, या प्रकरणातील कोणीही दोषी असेल त्यांना तुम्ही सोडणार नाही असा विश्वास आहे, संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केली नाही, संजय राठोड हे समाजाचे नेते आहे, परंतु संशयामुळे त्यांचा बळी घेऊ नये, या प्रकरणाचं राजकारण होऊ नये असं पत्र आईवडिलांनी दिलं, ज्यांच्या घरातील मुलगी गेली ते सांगतात राजकारण करू नये, मात्र विरोधक यात दुर्दैवी राजकारण करत आहेत असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर आरोप केला.  

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी वनमंत्री संजय राठोड विरोधकांवर संतापले

खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येबद्दल कुणीच बोलत नाही

सात टर्म राहिलेल्या खासदाराने मुंबईत येऊन आत्महत्या केली, त्यात १४-१५ पानांची सुसाईड नोट सापडली, त्यात अनेक भाजपा नेत्यांची नावं आहेत, त्यांचेही राजीनामे घेणार का? मोहन डेलकरांची बाजू कुणीही मांडत नाही, त्यांच्या आत्महत्येबद्दल कुणीच बोलत नाही, या प्रकरणात मुंबई पोलिसांना सहकार्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी आदेश द्यावेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.(CM Uddhav Thackeray Statement on MP Mohan Delkar Suicide)  

Web Title: Pooja Chavan Suicide Case:CM Uddhav Thackeray Target BJP over Sanjay Rathod Resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.