Pooja Chavan: Pooja Chavan's cousin's grandmother's big Statement about Arun Rathore, said ... | Pooja Chavan : अरुण राठोडबाबत पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या...

Pooja Chavan : अरुण राठोडबाबत पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या...

पुणे/मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप झालेले राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी यावरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी अधिकच भडकला आहे. (Pooja Chavan Suicide Case ) दरम्यान, पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी या प्रकरणात आवाज न उठवण्यासाठी पाच कोटी रुपये घेतल्याचा दावा केला. तसे पूजा चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यातील संबंधांबाबतही मोठा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला. (Pooja Chavan's cousin's grandmother's big Statement about Arun Rathore)

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड हा बेपत्ता आहे. या प्रकरणात त्याच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड म्हणाल्या,अरुण राठोड माझ्या गावातला मुलगा आहे. माझ्या माहेरचा नातलग आहे. तो माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. अरुण राठोड हा पूजा चव्हाणचा कुणीच नाही. तसेच अरुणच्या विरोधात आमची काहीही तक्रार नाही.      

यावेळी पूजाच्या आई वडिलांनी या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड यांनी केला. पूजाच्या आईवडलांनी पाच कोटी रुपये घेतले आहेत. त्यामुळे ते या प्रकरणावर बोलणार नाहीत. तसेच न्यायाची मागणी करणार नाहीत. मात्र मी न्यायासाठी लढत राहणार, असे पूजाची आजी म्हणाली. तसेच पूजाचा आई-वडिलांना पाच कोटी रुपये संजय राठोड यांनीच दिले. तसेच याबाबतचे पुरावे वेळ आल्यावर देईन, असेही त्यांनी सांगितले.  

दरम्यान, 'पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासूनच आवाज उठवलेला आहे. पूजाचे आई वडिल काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई वडिलांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई वडिलांनी पैशापोटी स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई वडील खोटं बोलत आहेत,' असा दावा शांताबाई राठोड यांनी आज सकाळी केला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pooja Chavan: Pooja Chavan's cousin's grandmother's big Statement about Arun Rathore, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.