शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

Pooja Chavan Death Case: संजय राठोडांनी ५ कोटी रुपये दिल्यानं पूजा चव्हाणचे आई-वडील गप्प; आजीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:35 IST

Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा दावा; पूजाच्या आई वडिलांवर अतिशय गंभीर आरोप

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी काल वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांमध्ये समोर आलेले पूजासोबतचे फोटो, ऑडिओ क्लिप, दोन आठवडे बाळगलेलं मौन, पोहरादेवीतलं शक्तिप्रदर्शन राठोड यांना महागात पडलं. आता या प्रकरणात आणखी काय काय समोर येणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांता राठोड यांनी एक अतिशय धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. पूजा चव्हाण प्रकरण भोवले; अखेर संजय राठोड यांचा राजीनामापूजा चव्हाणच्या आई वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिले. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे. 'पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासूनच आवाज उठवलेला आहे. पूजाचे आई वडिल काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई वडिलांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई वडिलांनी पैशापोटी स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई वडील खोटं बोलत आहेत,' असा दावा शांता यांनी केला. 'संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन पूजाच्या आई वडिलांचं तोंड बंद केलं आहे. त्यामुळेच ते स्वत:च्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत नाहीत. ते आता आयुष्यभर आमची मुलगी मानसिक ताणाखाली होती असंच सांगणार. त्यांचा आवाज कायम दबकाच राहणार. पूजाच्या आई वडिलांना पैसा मिळाला आहे. तो पैसा आता बोलत आहे. पूजाचा घात झाला. पण पैशापोटी तो दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असा आरोप शांता राठोड यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

विदर्भातील शिवसेनेचा वाघ जायबंदी; संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द धोक्यात

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी काल भेट घेतली. यावेळी आईवडील, बहिण उपस्थित होती. पूजाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी देऊ नका अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

वाचा हे संपूर्ण पत्र जसं आहे तसंच...

माननीय मुख्यमंत्री महोदय

महाराष्ट्र राज्य

विषय: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवणेबाबत

महोदय,

आमची मुलगी पूजा चव्हाण हिचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला कुठल्याही माता-पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्य मंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहेत.

आपण या संदर्भात पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतु या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीव राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये आमच्या आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्या

आपले नम्र

लहू चंदू चव्हाण (वडील)

मंदोधरी लहू चव्हाण (आई)

दिव्यानी लहू चव्हाण (बहीण) 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना