शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृविचे कृषी साहाय्यक पदे भरणार

By admin | Updated: January 26, 2015 00:45 IST

६९ जागांसाठी ३,३७५ उमेदवारांनी दिली परीक्षा.

अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ६९ कृषी साहाय्यक पदासाठी ३,३७५ उमेदवारांनी रविवार, २५ जानेवारी रोजी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये लेखी परीक्षा दिली.राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत नोकर भरती करण्यासाठी शासनाने एक महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळ स्थापन केले होते; तथापि हे मंडळ कार्यरत झाले नसल्याने कृषी विद्यापीठाची नोकर भरती प्रक्रिया रखडली होती. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कर्मचारी अनुशेष पंधराशेपेक्षा जास्त जागांनी वाढला आहे. या पृष्ठभूमीवर कृषी विद्यापीठांनी ही वस्तुस्थिती शासनासमोर मांडल्यानंतर शासनाने जुन्या पद्धतीनुसारच भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश एक महिन्यापूर्वी कृषी विद्यापीठांना दिले होते.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरुवातीला कृषी साहाय्यक पदवीधर ३३ आणि कृषी साहाय्यक पदविका ३६ जागासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, प्राप्त अर्जाच्या छानणीनंतर दोन्ही साहाय्यक पदासाठी अनुक्रमे १0३९ आणि २,३३६ उमेदवारांना लेखी परीक्षेला बोलावले. ही परीक्षा अकोला शहरातील एलआरटी कॉर्मस, आरएलटी विज्ञान, सीताबाई कला आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती यांनी ६९ कृषी साहाय्यक पदासाठी पदवी आणि पदविका मिळून ३,३७५ उमेदवारांची लेखी परीक्षा २५ जानेवारी रोजी घेण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.