शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

तडजोड होणार की मतदान?

By admin | Updated: March 11, 2015 01:54 IST

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये अद्याप

मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून दोन्ही काँग्रेसमध्ये अद्याप समेट झालेला नाही. उलट भाजपाच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पडद्याआड व्यूहरचना करत असल्याची चर्चा आहे.सभापती देशमुख यांच्यावर हिवाळी अधिवेशनात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंगळवारच्या कामकाज पत्रिकेवर दाखवण्यात आला होता. त्यामुळे देशमुख यांनी सकाळपासून सभापतींच्या आसनावर बसण्याचे टाळले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यावरून सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब होऊन दिवसभराकरिता बंद झाल्याने हा अविश्वास प्रस्ताव मतासाठी टाकण्यात आलाच नाही. आता बुधवारी पुन्हा कामकाज पत्रिकेवर तो दाखवण्यात येईल.याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सभापतींविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. संख्याबळाच्या आधारे सभापतीपद राष्ट्रवादीकडे असणे गरजेचे आहे. अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्याकरिता भाजपाची मदत घेण्याच्या शक्यतेसंबंधी विचारले असता तटकरे यांनी ही शक्यता फेटाळून लावली, पण ऐनवेळी बघू, असे मोघम उत्तर दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे मंगळवारी दिल्लीत गेले असून, तेथे ते पक्षश्रेष्ठींबरोबर अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यामध्ये एक मुद्दा हा सभापतीपदाच्या वादाचा असल्याचे कळते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीने सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती काँग्रेसने केली आहे. मात्र हा प्रस्ताव मंजूर करवून घ्यायचा तर राष्ट्रवादीला भाजपाची मदत घेण्याखेरीज पर्याय नाही. राष्ट्रवादीने भाजपाची मदत घेतली तर दोन्ही सभागृहांतील विरोधकांच्या एकजुटीवर त्याचा निश्चित विपरीत परिणाम होईल. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट म्हणाले की, सभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव ज्या वेळी मतास टाकण्यात येईल त्या वेळी भाजपा आपली भूमिका निश्चित करील. (विशेष प्रतिनिधी)