शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
2
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
6
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
7
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
8
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
9
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
10
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
11
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
12
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
13
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
14
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
15
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
16
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
17
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
18
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
19
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
20
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 09:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. १ कोटी ५४ लाख मतदार गुरुवारी मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण १६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला मतदारांची संख्या जवळपास पुरुषांच्या बरोबरीने असल्याने त्यांचे मत महत्त्वपूर्ण असेल.


अमरावतीमध्ये रंगतदार लढतीची उत्सुकता
अमरावती मतदारसंघात यावेळी मोठी रंगतदार लढत होत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेल्या नवनीत राणा यांनी कवडे आव्हान दिले आहे. शेवटच्या टप्प्यात अडसुळांनी राणांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विकासाचे बोला, असे प्रत्युत्तर राणांनी दिले.

हिंगोलीतील विजयाचे गणित विसंबून
हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत असून, वंचित आघाडी, बसपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित आहे.
हेही उमेदवार रिंगणात : वंचित आघाडीचे मोहन राठोड, बसपाचे डॉ.दत्ता धनवे, आयूएमएलचे अल्ताफ अहमद, बीआरएसपीचे असदखान म.खान, पीआरपीचे उत्तम कांबळे, एएचपीचे उत्तम धाबे, बीएमपीच्या वर्षा देवसकर, एचबीपीचे सुभाष वानखेडे, बीएमपीचे सुभाष वानखेडे, अपक्ष अ.कदीर, त्रिशला कांबळे, गजानन भालेराव, जयवंता वानोळे, देवजी असोले, प्रकाश घुन्नर, म.अहेमद, अ‍ॅड.मारोतराव हुक्के, वसंत पाईकराव, सुनील इंगोले २आदी २८ उमेदवार रिंगणात आहेत.

सोलापुरात तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.
हेही उमेदवार रिंगणात : लोकसभा निवडणुकीत 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वरील तीन प्रमुख उमेदवारांबरोबरच अर्जुन ओहळ, कृष्णा भिसे, विष्णू गायधनकर, व्यंकटेश स्वामी, अशोक उघडे, सुदर्शन खंदारे, अ‍ॅड. मनीषा कारंडे, मल्हारी पाटोळे, अ‍ॅड. विक्रम कसबे, श्रीमंत मस्के या उमेदवारांचा समावेश आहे. यातील सहा उमेदवार अपक्ष आहेत. सन २0१४ मध्ये १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात ११ अपक्ष उमेदवार होते, तसेच सन २00९ मध्ये १३ जण निवडणूक रिंगणात होते त्यात अपक्ष ७ होते.

नांदेड प्रतिष्ठेची लक्षवेधी लढत
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात असले, तरी काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे़ प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती़
हेही उमेदवार रिंगणात : नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत होत असली, तरी नोंदणीकृत राजकीय पक्षाचे अब्दुल रईस अहेमद, अब्दुल समद, मोहन वाघमारे, सुनील सोनसळे तर अपक्ष म्हणून श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, माधवराव गायकवाड, रणजीत देशमुख, शिवानंद देशमुख हेही उमेदवार रिंगणात होते़ सर्वच उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला़

उस्मानाबादेत कौटुंबिक वादाची किनार
उस्मानाबाद मतदारसंघात यावेळी १४ उमेदवार रिंगणात आहेत़ गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची जोरदार चुरस रंगली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे नात्याने चुलत भाऊ. मात्र, त्यांच्या कुटुंबातील वैर जगजाहीर आहे. निवडणूक प्रचारातही दिसून आले.
हेही रिंगणात : प्रमुख दोघांसह वंचित आघाडीचे अर्जुन सलगर, बसपाचे डॉ़शिवाजी ओमन, आण्णासाहेब राठोड, दीपक ताटे, विश्वनाथ फुलसुरे, आर्यनराजे शिंदे, नेताजी गोरे, जगन्नाथ मुंडे, तुकाराम गंगावणे, वसंत मुंडे, शंकर गायकवाड, सय्यद सुलतान हेही रिंगणात आहेत़

लातूरची लढाई दिल्लीची अन् चर्चा गल्लीची!
लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत आणि भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्यातच आहे. शिवाय, या लढतीला मंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अमित देशमुख असे स्वरूप आल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकेका मतासाठी जिवाचे रान करत आहेत.
हेही रिंगणात : वंचित आघाडीकडून राम गारकर, बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे रूपेश शंके, मधुकर कांबळे, पपिता रणदिवे, रमेश कांबळे हे रिंगणात आहेत़

अकोल्यात नव्या विक्रमाची लढत
अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे. धोत्रे यांनी विजय मिळविला, तर अकोल्यातून सलग चौथ्यांदा जिंकणारे ते पहिलेच ठरतील. आंबेडकर जिंकले, तर काँग्रेससोबत आघाडी न करता विजयी होण्याचा विक्रम करतील. हिदायत पटेल विजयी झाले, तर तीन दशकांनंतर काँग्रेसला यश मिळेल.
हेही उमेदवार रिंगणात : अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिगणात आहेत भाजपा, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रमुख लढत होत असून, बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडियाचे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, तसेच अपक्ष उमेदवार म्हणून गजानन हरणे, मुरलीधर पवार, अरुण ठाकरे, प्रवीण कौरपुरीया, सचिन शर्मा हेदेखील रिंगणात आहेत.

बीडमध्ये मुंडे घराण्याची प्रतिष्ठा पणाला
बीड लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यातच होत आहे. शिवाय, या लढतीला मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वादाची किनार लाभल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हेही उमेदवार रिंगणात : विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी), स. मुज्जमील स.जमील (सपा), अशोक थोरात (हम भारतीय पार्टी), कल्याण गुरव (भारतीय सुराज्य पक्ष), गणेश करांडे (महाराष्ट्र कांती सेना), रमेश गव्हाणे (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल), चंद्रप्रकाश शिंदे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), सादेक मुनीरोद्दीन शेख (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) यांच्यासह २६ अपक्ष असे एकूण ३६ उमेदवार आहेत.

परभणीत खरी काँटे की टक्कर!
परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे. दोघेही तगडे उमेदवार असल्याने लढतीत चुरस आहे.
हेही उमेदवार रिंगणात : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ़ वैजनाथ फड, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्यासह एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ या उमेदवारांनीही जोरदार प्रचार चालविला़ विशेषत: वंचित बहुजन आघाडीचे खान यांच्यासाठी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा, पाथरीत जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपवर प्रखर टीका केली़

बुलडाण्यात युती-आघाडीत दुरंगी लढत
बुलडाणा लोकसभा मतदार संघात युती आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे. निवडणूक रिंगणात १२ उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात होत आहे, हे दोन्ही नेते जिल्ह्यासाठी हेवीवेट आहेत.
हेही उमेदवार आहेत रिंगणात : १७व्या लोकसभेसाठी बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १२ उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार, बसपाचे अब्दुल हफीज, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रताप पाटील आणि अपक्ष म्हणून अनंता पुरी, गजानन उत्तम शांताबाई, दिनकर सांबारे, प्रविण मोरे, वामनराव आखरे, भाई विकास प्रकाश नांदवे, विजय बनवारीलालजी मसानी हे सात जण निवडणूक रिंगणात उभे आहेत
 

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019hingoli-pcहिंगोलीnanded-pcनांदेडsolapur-pcसोलापूरparbhani-pcपरभणीbeed-pcबीडlatur-pcलातूरamravati-pcअमरावतीakola-pcअकोलाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९