शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या मुद्द्यावर राजकारण नकोे

By admin | Updated: June 5, 2015 23:46 IST

राजकीय प्रश्न असतील, तेव्हा ज्याच्या-त्याच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करावे. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्रित शक्ती पणाला लावली, तर समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.

बारामती : राजकीय प्रश्न असतील, तेव्हा ज्याच्या-त्याच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करावे. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्रित शक्ती पणाला लावली, तर समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. भाजपाच्या नेतृत्वाने गरीब समाजातील अमर साबळे या व्यक्तीला त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे खासदार केले. याच संधीचे सोने त्यांनी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.भाजपाचे राज्यसभेतील नवनियुक्त खासदार अमर साबळे यांचा बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, भटके विमुक्त जाती-जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते, आमदार दत्तात्रय भरणे, राजेंद्र पवार, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, सभापती करण खलाटे, समितीचे समन्वयक अ‍ॅड. सुभाष ढोले, दिलीप शिंदे, अविनाश रणसिंग, संजय संघवी, संभाजी होळकर, अविनाश मोटे, विश्वासराव देवकाते आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘बारामतीकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. अमर साबळे यांच्या रूपाने नववा खासदार मिळाला. बारामतीच्या आमराई विभागातून ३ खासदार देशाच्या सर्वोच्च संसदेचे प्रतिनिधत्व करतात.’’साबळे यांनी त्यांच्या भाषणात बारामतीला रेल्वेमार्गाने देशाला जोडण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावर पवार म्हणाले, ‘‘सुरुवातीला बारामती-फलटण रेल्वेमार्ग बागायती भागातून जाणार होता. त्याला बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर जिरायती भागातून हा मार्ग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तो खर्चीक आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. तरीदेखील खऱ्या अर्थाने देशाच्या दक्षिणोत्तर भागाला बारामतीला जोडण्यासाठी हा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.’’या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘राजकीय जीवनात यश-अपयश येत असते; परंतु त्यासाठी भूमिका बदलणे चुकीचे ठरते.’’ भटक्या विमुक्त जाती-जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते म्हणाले, ‘‘दलित चळवळीतील कार्यकर्ता चिंतनशील आहे. आंबेडकरी विचाराची जुळणी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेली संधी खरोखरच महत्त्वाची आहे.’’सत्काराला उत्तर देताना साबळे म्हणाले, ‘‘बारामतीच्या विकासात खासदारकीच्या माध्यमातून शक्य होईल तेवढे काम केले जाईल. खासदारकी मिरवण्यासाठी नाही, तर या देशाच्या वैभवासाठी झटण्याचे दायित्व देण्यासाठी आहे. बारामतीकरांनी मोठ्या मनाने आपला नागरी सत्कार केला. त्या ऋणात राहणेच मी पसंत करीन.’’संयोजक नगरसेवक सुभाष ढोले यांनी प्रास्ताविक केले. भारत गावडे पाटील यांनी आभार मानले. दिलीप शिंदे, अविनाश मोटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)