शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही

By admin | Updated: September 21, 2015 00:31 IST

‘मॉर्निंग वॉक’मधील सूर : पुरोगामी संघटनांकडून पोलिसांच्या तपासावर समाधान

कोल्हापूर : पुरोगामी संघटनांतर्फे पानसरेंचे सागरमाळ येथील निवासस्थान ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर समाधान व्यक्त करण्यात आले. संशयिताला पकडण्यात यश मिळाले असले तरी या तपासात राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. पोलिसांना पुढील तपासासाठी सगळ्यांनीच सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गोविंद पानसरे सकाळी सागरमाळ ते शिवाजी विद्यापीठ परीक्षा भवन या मार्गावर फिरायला जात होते़ त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेबु्रवारीला पानसरे यांचे निधन झाले होते़ या खुनानंतर पुरोगामी चळवळीला निर्भयतेचा संदेश देण्यासाठी डाव्या आणि अन्य पुरोगामी कार्यकर्त्यांनी पानसरेंच्या या मार्गावर गेले सात महिने दर महिन्याच्या २० तारखेला ‘मॉर्निंग वॉक’ सुरू केले.यावेळी नर्मदा आंदोलनातील कार्यकर्त्या सुनीती सुलभा रघुनाथ म्हणाल्या, प्रागतिक विचारांचे लोक धर्माचा पगडा असलेल्या सर्वसामान्य लोकांशी फटकून वागतात़ या सर्वसामान्य लोेकांना धर्मांधाकडून होणारे शोषण माहीत नसते़ त्यामुळे ते सहजपणे ‘सनातन’सारख्या धर्मांध शक्तीसोबत एकरूप होतात़ अशा हिंदू नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना पुरोगामीत्व समजून सांगणे व त्यांची शोषणातून मुक्तता करणे ही पुरोगाम्यांची जबाबदारी आहे़ सकाळी सात वाजता या ‘मॉर्निंग वॉक’ला पानसरे यांच्या घरापासून प्रारंभ झाला़ ‘आम्ही सारे पानसरे’ अशा टोप्या घातलेले कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले होते़ मारेकरी सापडून त्यांना शिक्षा होईपर्यंत हे वॉक सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला़ वॉकमध्ये मेघा पानसरे, सुरेश शिपूरकर, तनुजा शिपूरकर, दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, एस़ बी़ पाटील, उदय नारकर, प्रा़ रणधीर शिंदे, अलका देवलापूरकर, सुचेता पडळकर, विनय रघुनाथ, नरहर कुलकर्णी, जीवन बोडके, राजेंद्र पारिजात, उमेश पानसरे, कबीर पानसरे, ज्योती भालकर, सीमा पाटील, रसिया पडळकर होते़ (प्रतिनिधी) ‘हू वॉज शिवाजी’चे पुनर्प्रकाशन रविवारी झालेल्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये गोविंद पानसरेलिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘हू वॉज शिवाजी’चे पुनर्प्रकाशन प्राचार्य टी़ एस़ पाटील यांच्या हस्ते झाले़ या पुस्तकाचा अनुवाद उदय नारकर यांनी केला असून दिल्ली येथील लेफटवर्ड या प्रकाशनाने हे पुस्तक पानसरे यांच्या हत्येनंतर प्रकाशित केले आहे. प्राचार्य टी़ एस़ पाटील म्हणाले, पानसरेंनी ब्रिटिश, पर्शियन, पोर्तुगीज काळात शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या संदर्भपूर्ण पुस्तकांची सुमारे दहा हजार पाने वाचून ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक पानसरेंनी लिहिलेले आहे. समीरची आई सांगलीत परतलीसांगली : कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडची आई शांताबाई गायकवाड या रविवारी सांगलीत घरी परतल्या. गेल्या चार दिवसांपासून त्या कोल्हापुरात होत्या.पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीरला गेल्या आठवड्यात सांगलीत अटक केली होती. तेव्हापासून त्याची आई कोल्हापुरात होती. रविवारी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी आम्हाला कोणाशी बोलायचे नाही, असे सांगून दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. सुरुवातीला एक पोलीस तैनात होता; पण रविवारपासून दोन पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक सांगलीत येणार असल्याची चर्चा सुरू राहिल्याने सांगली पोलीस सतर्क झाले होते.