शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांसोबत पोलिसांची पार्टी

By admin | Updated: June 17, 2016 02:39 IST

सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात अट्टल कैद्यांसोबत दोघा पोलिसांनी ओली पार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात अट्टल कैद्यांसोबत दोघा पोलिसांनी ओली पार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी रुग्णालयात छापा टाकल्यानंतर टेरेसवरुन उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्न करताना तिघे कैदी जखमी झाले. याप्रकरणी मोकाखाली अटकेत असलेल्या सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोन पोलिसांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार बाबूराव चौगुले, आणि पोलिस कॉन्स्टेबल मारुती पाटील अशी अटक झालेल्या पोलिसांची नावे आहेत. याशिवाय मोकाखाली कैदेत असलेला सोमप्रशांत पाटील याच्यासह दिग्विजय पोवार यालाही अटक झाली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील गजा मारणे टोळीतील सोमप्रशांत पाटील हा सीपीआर येथील कैदी वॉर्डात दि. १३ मे २०१६ पासून मूत्रपिंडाच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल आहे. बुधवारी रात्री संशयित सहाय्यक फौजदार बाबूराव चौगुले, कॉन्स्टेबल मारुती पाटील हे सोमप्रशांत पाटील, दिनेश कदम, जगदिश बाबर, अभिजित चव्हाण, दिग्विजय पोवार हे कैदी असे सातजण कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवर मद्यप्राशन करून जेवायला बसले होते. हा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच त्यांची एकच धांदल उडाली. त्यावेळी संजय कदम, जगदिश बाबर व अभिजित चव्हाण या तिघांना इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. त्यामध्ये बाबर व अभिजित चव्हाण या दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले तर दिनेश कदमचा हात मोडला व ते जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)