शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या

By admin | Updated: May 25, 2017 02:33 IST

सांताक्रुझमधील गृहनिर्माण सोसायटीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची धारधार शस्त्राने मंगळवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सांताक्रुझमधील गृहनिर्माण सोसायटीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची धारधार शस्त्राने मंगळवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली. ‘टायर्ड आॅफ हर, कॅच मी अ‍ॅण्ड हँग मी,’ असे वाक्य रक्ताने मृतदेहाजवळ लिहिलेले असून, त्यांचा मुलगा सिद्धांत हा बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गणोरे हे सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एजी पार्क सोसायटीत तीन वर्षांपासून पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धांतसह राहतात. खार पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गणोरे यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपास पथकात काम केले आहे. त्यांची ताडदेव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मात्र अजून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.मंगळवारी रात्री ११ वाजता गणोरे घरी आले. तेव्हा दरवाजा बाहेरून बंद होता. पत्नी आणि मुलगा दोघांचाही मोबाइल लागत नसल्याने ते दोघे बाहेर गेले असल्याच्या विचाराने गणोरे खालीच बसून राहिले. बराच वेळ झाल्याने साडेबाराच्या सुमारास त्यांनी घराकडे धाव घेतली. घराशेजारील कचऱ्याच्या पेटीत त्यांना चावी सापडली. घरात प्रवेश केल्यानंतर पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास ही माहिती दिली. दीपाली या उच्चशिक्षित होत्या. सिद्धांतनेही उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी त्या आग्रही होत्या. सिद्धांतने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र तेथे अडचणी येत असल्याने नंतर त्यास वांद्रे येथील महाविद्यालयात टाकण्यात आले. तो ‘बी. एसस्सी’च्या पहिल्या वर्षाला आहे. तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून गणोरे हे दुपारीच पोलीस ठाण्यातून निघाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली. तर गणोरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत ते रात्री ११ वाजता घरी आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गणोरे नेमके कुठे गेले होते? ते केव्हा घरी आले? याचाही पोलीस तपास करत आहेत. दीपाली यांच्या मानेवर पाच, छातीवर तीन आणि हातावर एक असे एकूण नऊ वार करण्यात आले.दीपाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरून चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात मुलावर संशय असून, त्याचा शोध सुरू आहे. मात्र केवळ त्यावरच न थांबता सर्व बाजूंनी तपास करण्यात येईल, असे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ महादेव वावळे यांनी सांगितले.