शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमीओंचे आता पोलीस करणार शूटिंग!

By admin | Updated: August 28, 2014 03:34 IST

शाळा-कॉलेज, रेल्वे स्थानक बस स्टॉप किंवा अगदी गल्लीच्या नाक्यावर महिलांची छेड काढणाऱ्यांनो सावधान

मुंबई : शाळा-कॉलेज, रेल्वे स्थानक बस स्टॉप किंवा अगदी गल्लीच्या नाक्यावर महिलांची छेड काढणाऱ्यांनो सावधान. तुम्ही केलेला पाठलाग, आळवलेली शिट्टी किंवा मारलेले टोमणे व्हिडीओ कॅमेऱ्यात चित्रित होणार आहेत. इतकेच नव्हे तर हे चित्रण तुमच्या आईवडिलांना, बहिणीला, अगदी पत्नीलाही दाखवले जाणार आहे. येता-जाता महिलांना छेडणाऱ्या रोडरोमीओंचा बंदोबस्त करण्यास उत्तर मुंबईचे अपर आयुक्त किशोर जाधव यांनी हा उपक्रम सुरू केला. रोमीओंचे मानसिक खच्चीकरण करण्यास त्यांच्या उदाहरणाने इतरांनी धसका घ्यावा, या उद्देशाने साध्या वेषातली पोलीस पथके छेडछाडीच्या घटना कॅमेराबद्ध करतील. कारवाईत सापडलेला विद्यार्थी असल्यास, पहिल्यांदाच सापडलेला असल्यास त्याला पुन्हा छेडछाड करताना पकडल्यास अटक केली जाईल, अशी ताकीद पालकांसमोर देऊन सोडण्यात येईल. मात्र सराईतांना थेट गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. या कारवाईतून पोलीस सगळीकडे आहेत, पोलिसांचे सर्वत्र लक्ष आहे, छेडछाड केल्यास कारवाई होणारच, हा महत्त्वाचा संदेश सर्वत्र पसरेल. शिवाय रोडरोमीओंचे मानसिक खच्चीकरण होईल. त्याचा धसका इतर घेतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.