शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची तरुणीसह आईला मारहाण

By admin | Updated: September 29, 2015 03:05 IST

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह ५५ वर्षीय आईला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली

मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह ५५ वर्षीय आईला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलीस उपायुक्तांना चौकशी करुन दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिले आहे.मीरारोड येथे राहणारी नंदिनी गोस्वामी ही तरुणी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आई, वडिलांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. सामान्य नागरिकांच्या रांगेत उभी असताना व्हीआयपी प्रवेशद्वारातून नागरिक जातात हे पाहून तिनेही व्हीआयपी गेटकडे धाव घेतली. अशात गेटच्या आत प्रवेश करणार तोच तेथे तैनात असलेल्या महिला पोलिसांनी तिच्या आईला धक्काबुक्की करत बाहेर काढले. यामध्ये त्यांचे कपडे फाटले. आईला मारहाण केल्यानंतर नंदिनीने पोलिसांकडे जाब विचारण्यास सुरुवात केली. नंदिनीच्या आक्रोशाने तेथील महिला पोलिसांनी तिला एखाद्या जनावरासारखे मारहाण करण्यास सुरुवात केली. चारही बाजूने महिला पोलीस तिला मारहाण करत होते.नंदिनीच्या बचावासाठी तिच्या वडिलांनी तिला कवेत घेतले तर आईनेही मदतीसाठी पुढाकार घेतला असता, आईलाही महिला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या वयाचा विचार न करता महिला पोलीस त्यांना मारहाण करत होते. मारहाण करत तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे तिला १२०० रुपयांच्या दंड ठोकून रात्री अडीचच्या सुमारास सोडण्यात आले. यावर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणार असल्याचेही नंदिनीने सांगितले.----------महिला पत्रकारालाही ठेवले डांबून : पत्रकार पूनम अपराज या शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घरी जाण्यास निघाल्या. तेव्हा लागबागच्या राजाच्या दर्शनासाठी चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याने त्यांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच तिला धक्काबुकी करत तिच्याकडील मोबाईल हिसकावून सर्व व्हीडिओ क्लीप डिलीट केल्या. त्यानंतर तिला मारहाण करत पोलीस व्हॅनमधून काळाचौकी पोलीस ठाण्यात आणले. तेथे तिला रात्री अडीचच्या सुमारास १२०० रुपयांचा दंड आकारुन सोडल्याची तक्रार तिने दिली आहे. -------दबंग पोलीस निलंबित होणार?तरुणीसह महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपायुक्त अशोक दुधे करत आहेत.-------महिला संघटनांचा निषेध : पत्रकारासह तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. वुमन जर्नलिस्ट असोसिएशनकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना निवेदन देण्यात आले.