पंतप्रधान आज पुणे दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 02:58 IST2016-11-13T02:58:29+5:302016-11-13T02:58:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर येत असून दुपारी साडेचार वाजता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट (व्हीएसआय) येथे आयोजित ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ या आंतरराष्ट्रीय

PM's visit to Pune today | पंतप्रधान आज पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान आज पुणे दौऱ्यावर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर येत असून दुपारी साडेचार वाजता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट (व्हीएसआय) येथे आयोजित ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान परिषदेनिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. सायकांळी सहा वाजेपर्यंत ते सीरम इन्स्टिटयुट आॅफ इंडियाला भेट देतील. त्यानंतर सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी ते हवाईदलाच्या विमानाने दिल्लीला परततील. (प्रतिनिधी)

Web Title: PM's visit to Pune today