शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या बैठकीत PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख; आमदारांना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:30 IST

महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या अशी सूचना मोदींनी केली. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यात महायुती मजबूत करण्यासोबतच एकमेकांशी समन्वय साधण्याची सूचना केली. त्याशिवाय आमदारांनी मतदारसंघाची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही केलेल्या कामांवर लोकांची मते काय हे जाणून घेतले पाहिजे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा उल्लेख आमदारांच्या बैठकीत केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर आले होते त्यांचे उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे आमदारांनी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला मोदींनी दिला.  २०११ साली राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता तसेच आमदारांनी अभ्यास दौरे केले पाहिजेत. समाज आणि मतदारसंघासोबतच  कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे. कामाचा संकल्प करून त्याचे नियोजन केले पाहिजे असं त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी आमदारांना काय कानमंत्र दिले?

  • सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, दरवर्षी मेडिकल चाचणी करून घ्या
  • घरातील कुटुंबाकडे विशेष लक्ष द्या, सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका
  • विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे
  • सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा
  • मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा

 

दरम्यान, महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या. गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपलं सगळ्याकडे लक्ष असले पाहिजे. गुजरातमध्ये ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुकीत भाजपाने सत्ता कशी राखली याचे उदाहरण पंतप्रधानांनी बैठकीत दिले. येणाऱ्या काळात महायुती आमदारांनी तसेच काम करावे असा सल्ला मोदींनी दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुती