"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:26 IST2025-10-08T18:25:19+5:302025-10-08T18:26:33+5:30
"ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्व आहे. तेथे तीन चार वर्षांपर्यंत या सुविधेपासून मुंबईकर वंचित रिहिले. हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही..."

"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
बंधूंनो आपण अशा संस्कारात वाढलो आहोत, जेथे राष्ट्रीय धोरणच राजकारणाचा आधार आहे. आमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर लागणारा प्रत्येक पैसा देशवासीयांची सुविधा आणि सामर्थ्य वाढवण्याचे माध्यम आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, देशात एक असा राजकीय विचारही राहिला आहे, जो जनतेच्या सुविधेला नव्हे, तर सत्येच्या सुविधेला अधिक महत्व देतो. हेच लोक विकास कामात अडथळे निर्माण करतात. घोटाळे करून विकासाशी संबंधित प्रोजेक्ट विकासाच्या पटरीवरून खाली खेचतात. अनेक दशके देशाने असे नुकसान पाहिले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
"आज ज्या मेट्रो लाइनचे लोकार्पन झाले आहे, ते त्या लोकांच्या कारनाम्यांचीही आठवण करून देते. मी भूमीपूजनासाठी आलो होतो. तेव्हा लाखो लोकांना आशा वाटत होती की, त्यांचा त्रास कमी होईल. मात्र नंतर, काही काळासाठी जे सकरार आले, त्या सरकारने हे कामच थांबवले होते. त्यांना सत्ता मिळाली. मात्र देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले होते. एवढ्या वर्षांपर्यंत असुविधा निर्माण झाली. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता तत्कालीन मविआच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच, "आता ही मेट्रोलाईन झाल्याने दोन-अडीच तासांचा प्रवास तीस चाळीस मिनिटांत होईल, असेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, "ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्व आहे. तेथे तीन चार वर्षांपर्यंत या सुविधेपासून मुंबईकर वंचित रिहिले. हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही. गेल्या 11 वर्षांपासून देशवासीयांचे जीवन सोपे करण्यावर जोर दिला जात आहे. यामुळे रेल्वे, रोड, एअरपोर्ट, मेट्रो, इलेक्ट्रिकबस, आंदींवर अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे." एवढेच नाही तर, "अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रोडेक्ट तयार करण्यात आले आहेत. दळवणाचे प्रत्येक माध्यम एकमेकांशी जोडले जात आहे. लोकांना सीमलेस ट्रॅव्हल मिळे, एका माध्यमापासून दुसऱ्या माध्यमापर्यंत भटकणे भाग पडू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे." असेही मोदी यावेळी म्हणाले.