शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा डाव, ३ वर्ष गप्प का?; समित कदमांचा अनिल देशमुखांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:01 IST

अनिल देशमुखांनी समित कदम यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांचे आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत असा आरोप केला. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा विरोधकांचा हा डाव आहे. गडकरींबाबतचा आरोप फेल झाल्यानं आता हे आरोप सुरू केलेत. मागील ३ वर्ष गप्प का होते असा सवाल करत समित कदम यांनी अनिल देशमुखांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 

देशमुखांच्या आरोपांवर समित कदम म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना पाडण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होतोय असा आरोप केला होता मात्र ते यशस्वी झालं नाही. त्यामुळे आता हे आरोप करणं सुरू केले आहे. अनिल देशमुखांच्या आरोपांकडे फारसं गांभीर्याने बघत नाही. देशमुख यांनी काय आरोप करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मला जी म्हणायचं आहे ते मी स्पष्ट केलंय असं त्यांनी सांगितले. लोकमत डॉट कॉमला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशमुखांचे आरोप फेटाळले. 

तसेच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडे दुसरे काही मुद्दे नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करायची, गडकरींचा मुद्दा अपयशी ठरला त्यामुळे आता हे सुरू आहे. मी अनिल देशमुखांना भेटलो हे आधीच मान्य केले आहे. माझे फोटो जे फेसबुक, इन्स्टाग्रामवर आहेत तेच देशमुखांनी दाखवले त्यात काही वेगळे नाही. माझे फोटो सर्वच नेत्यांसोबत आहेत. त्यांच्या नेत्यांनाही मी भेटलो आहे.  या गोष्टीला ३ वर्ष झाले, जेलमधून तुम्हाला बाहेर पडून २ वर्ष झाली, मग तुम्ही इतके दिवस गप्प का होता असा सवालही समित कदम यांनी अनिल देशमुखांना केला आहे.

दरम्यान, मी जनसुराज्य पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. जेव्हा आम्ही एनडीएचे घटक पक्ष झालो, वेगवेगळ्या बैठकीत आम्हाला निमंत्रण दिलं जातं, तेव्हा बैठकीला आम्हाला बोलावलं जातं, तेव्हा देवेंद्र फडणवीस असो वा सर्वच नेत्यांची भेट होते. मी घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्यामुळे सर्व नेत्यांसोबत माझा परिचय आहे. अनिल देशमुखांसोबत माझी ओळख ते अन्न नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून आहे. हे फोटो दाखवणे त्यावर चर्चा करणं याला अर्थ नाही असंही समित कदम यांनी म्हटलं. 

काय होते अनिल देशमुखांचे आरोप?

समित कदम देवेंद्र फडणवीसांच्या इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असा आरोप अनिल देशमुखांनी केला होता. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४