पोलिसांनी केलेले प्लँचेट सर्वात वेदनादायी- शैला दाभोलकर

By Admin | Updated: August 20, 2014 09:15 IST2014-08-20T02:06:27+5:302014-08-20T09:15:47+5:30

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी जीवाचे बलिदान देणा:या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट करावे ही सगळ्य़ात वेदनादायी बातमी होती,

Plenty of painkill done by police - Shaila Dabholkar | पोलिसांनी केलेले प्लँचेट सर्वात वेदनादायी- शैला दाभोलकर

पोलिसांनी केलेले प्लँचेट सर्वात वेदनादायी- शैला दाभोलकर

विश्वास पाटील - कोल्हापूर
समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी जीवाचे बलिदान देणा:या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी प्लँचेट करावे ही सगळ्य़ात वेदनादायी बातमी होती, अशा भावना दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला यांनी व्यक्त केल्या.
पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी गुन्हेगार सापडत नाहीत म्हणून नव्हे तर डॉक्टरांच्या हत्येचा विषय ‘अवे फ्रॉम द सब्जेक्ट’ न्यायचा होता. त्यांना गुन्हेगार पकडायचा असता तर त्यांनी पहिल्या दोन तासांतच नाकेबंदी केली असती, त्यासाठी सहा महिन्यांनी प्लँचेट केलं नसते, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
एका नियतकालिकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येस एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मृतीअंक प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये डॉ. शैला यांचे प्रदीर्घ आत्मकथन आहे. ‘नरेंद्र असो वा नसो..’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या या कथनामध्ये पती-पत्नीच्या नात्यापासून ते चळवळीच्या भवितव्याबद्दल त्यांनी अत्यंत परखड मते व्यक्त केली आहेत.
जेव्हा पोळ यांच्या लक्षात आलं की आपल्या कल्पनेपेक्षा अंधश्रद्धा निमरूलन समितीची ताकद जास्त 
आहे आणि ‘पोळ हटाव’ म्हणून समाजाचा दबाव वाढत चालला आहे; त्यांनी प्लँचेट केले,  असे डॉ. शैला म्हणतात.
 
सामाजिक कार्यकत्र्याना हवी सुरक्षा
राज्य शासन सामाजिक कार्यकत्र्याना सुरक्षा देऊ शकत नसेल तर राज्यकर्ते म्हणून राहण्याचा त्यांना अधिकार नाही. प्लँचेट प्रकरणामध्ये कारवाई करण्यास ज्या पध्दतीने दिरंगाई
केली ती पाहता त्यांना काही करायचे आहे, असे वाटत नाही. डॉक्टरांच्या खूनाचा तपास सीबीआयकडून 
अत्यंत संथ गतीने सुरू आहे, अजून प्राथमिक माहिती गोळा करण्याचेच काम सीबीआय करीत आहेत. 
सतीश शेटट्ी खून प्रकरणामध्ये 
ज्या पध्दतीने क्लोजर रिपोर्ट दिला गेला त्याप्रमाणो सीबीआयने शेवटी याही प्रकरणात तसेच काही करू
नये अशी भीती वाटते, असे हमीद दाभोळकर म्हणाले.

 

Web Title: Plenty of painkill done by police - Shaila Dabholkar