शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी नोंदणी करून सहकार्य करावे

By admin | Updated: January 21, 2017 03:30 IST

पनवेल महानगरपालिका हद्दीत १ जानेवारीपासून स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) लागू झाला आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत १ जानेवारीपासून स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) लागू झाला आहे. त्यासाठी नोंदणी करून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पनवेल येथे शुक्रवारी व्यापाऱ्यांना याबाबत माहिती देताना केले. ही बैठक शांततेत पार पडली.पनवेल येथील क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एल.बी.टी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी व्यापाऱ्यांची १० जानेवारी रोजी बोलवलेली बैठक शिवसैनिकांनी शहर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली उधळवून लावली होती. त्यामुळे पालिकेने शुक्र वारी २० जानेवारी रोजी पुन्हा बैठक बोलावली होती. या बैठकीला उपायुक्त मंगेश चितळे, कल्याण - डोंबिवली पालिकेचे एल.बी.टी. पहाणारे बागुल व कुळकर्णी हे अधिकारी उपस्थित होते. कल्याण - डोंबिवली पालिकेचे एल.बी.टी संबंधी अधिकारी बागुल यांनी ज्यांची वार्षिक उलाढाल २०१५-१६ किं वा चालू आर्थिक वर्षात ५० कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना पालिकेकडे एल.बी.टी.साठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संगितले. महिना संपल्यापासून २० दिवसात कर भरला नाही तर महिना २ टक्के व्याज भरावे लागेल अशी माहिती दिली. जो माल महापालिका हद्दीत खरेदी करून आणला जाईल त्याच्या बिलाच्या रक्कमेवर एल.बी.टी. भरावा लागेल. दारू दुकानांना उलाढाल कितीही असली तरी नोंदणी व कर भरावा लागेल. यावेळी त्यांनी नोंदणी रद्द करणे, बदल करणे व कर मिळणाऱ्या परताव्यासंबंधी माहिती दिली. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी जानेवारीपासून कर लागू झाल्याने उलाढालीचे आर्थिक वर्ष कसे धरणार कर कोणत्या उलाढालीवर भरावा लागणार याबाबत व्यापऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.>महापालिका क्षेत्राचा विकास व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने एल.बी.टी. महत्वाचा आहे. काही महिन्यांचा प्रश्न आहे. १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यावेळी महापालिकेला दिली जाणारी भरपाई या भरलेल्या करावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून योग्य कर भरावा.- डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल शहर महानगरपालिका