शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० हजार लाडक्या बहिणींना पिंक ई-रिक्षा देणार; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:32 IST

पोलिस ठाणे आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधनवाढीचाही विचार करू

कोल्हापूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणाऱ्या पिंक रिक्षांमुळे या क्षेत्रातही आम्ही कमी नाही हे महिला दाखवून देतील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षात जीपीएस सिस्टीमसह बसलेल्या व्यक्तीचे छायाचित्र काढण्याची व्यवस्था आहे. रक्षाबंधनानिमित्त ही महिलांना विशेष भेट असून, पहिल्या वर्षात राज्यात १० हजार रिक्षा वाटप करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली.कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे महिलांना पिंक ई-रिक्षा व रूपे कार्ड वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन उपस्थित होते.मंत्री तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण आणि पिंक ई-रिक्षा या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यात येत आहे. विमानतळ, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी पिंक ई-रिक्षांचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ३२ हजारांवर महिला जोडल्या गेल्या असून, त्यांचे कर्ज परफेडीचे प्रमाण ९९.९९ टक्के आहे. पोलिस ठाणे आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधनवाढीचाही विचार करू.