शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रकाराच्या आत्महत्येने कोल्हापुरात तणाव

By admin | Updated: November 1, 2015 01:49 IST

खरी कॉर्नर येथील छायाचित्रकार आनंदराव दत्तात्रय चौगले (६५) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपाचे नेते व नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमक्यांमुळे

कोल्हापूर : खरी कॉर्नर येथील छायाचित्रकार आनंदराव दत्तात्रय चौगले (६५) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपाचे नेते व नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमक्यांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी ठेवली होती. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत या आत्महत्येस राजकीय वळण लागल्याने दिवसभर शहरात तणाव होता.गेल्या ४० वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसायात असलेल्या आनंदराव चौगले यांचा खरी कॉर्नर येथे ‘आनंद फोटो स्टुडिओ’ आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सकाळी सहा वाजता फिरायला बाहेर पडले. त्यांचे धाकटे भाऊ दिनकर हे सकाळी साडेआठच्या सुमारास स्टुडिओ उघडण्यासाठी आले. यावेळी दुकानाचे शटर अर्धवट उघडले होते. त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, आनंदराव यांनी सीलिंंग फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांनी पाहणी केली असता, टेबलावर चिठ्ठी सापडली, ती त्यांनी जप्त केली. (प्रतिनिधी) छायाचित्रकार आनंदराव चौगले यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधील हस्ताक्षर त्यांचेच आहे का, हे तपासण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वी लिहून ठेवलेल्या त्यांच्या काही नोंदवह्या पोलिसांना द्याव्यात, असे पत्र पाठविले आहे. त्यांच्या नोंदवहीतील व चिठ्ठीमधील हस्ताक्षरामध्ये साम्य आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक कोल्हापूरत्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आम्ही कोणाविरोधात अद्याप तक्रार दिलेली नाही, परंतु चिठ्ठीतील मजकुरावरून पोलीस योग्य तो न्याय आम्हाला देतील. - दिनकर चौगले,मृत आनंदराव यांचे भाऊ‘आमदारावर गुन्हा दाखल करा’शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करीत, नगरसेवक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनीही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.