शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

राज्यात कापूस उपलब्धतेवरच सुतगिरणीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:40 IST

ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो. फक्त अशाच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग : ११५ तालुक्यांची यादी प्रसिध्द  सर्वसाधारणपणे सूतगिरणीसाठी एका वर्षाला किमान ४ हजार ८९६ टन कापसाची आवश्यकताराज्य शासनातर्फे राज्यातील ज्या तालुक्यात ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन

पुणे : राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन करणाºया ११५ तालुक्यांची यादी प्रसिध्द केली आहे. तसेच या कापूस उत्पादक तालुक्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सहकारी सूतगिरणी शिवाय नव्याने सहकारी सूतगिरणी स्थापन करताना ज्या तालुक्यात ५ हजार टनापेक्षा जास्त कापूस उपलब्ध होत असेल असाच तालुका नवीन सहकारी सूतगिरणी स्थापन करण्यासाठी पात्र असेल, असेही स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने  २०१८ ते २३ या वषार्चे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असून त्यानुसार सहकारी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरिता शासकीय भागभांडवलाची योजना ही केवळ कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात  येणार आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो. फक्त अशाच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.सर्वसाधारणपणे सूतगिरणीसाठी एका वर्षाला किमान ४ हजार ८९६ टन कापसाची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी नवीन सुतगिरणी स्थापन होणार आहे. तो सूतगिरणी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी दुप्पट म्हणजेच ९ हजार ६०० टन कापसाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेवून राज्य शासनातर्फे राज्यातील ज्या तालुक्यात ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन होते,अशा तालुक्यांची जिल्हानिहाय यादी अध्यादेशाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील १५ व यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. ज्या तालुक्यात कापसाचे ९ हजार ६०० टनांहून अधिक उत्पादन सलग दोन वर्षे होईल, अशाच तालुक्यांचा समावेश दरवर्षी आढावा घेतल्यानंतर कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये केला जाणार आहे, असेही अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.---------जिल्हानिहाय कापूस उत्पादक तालुक्यांची आकडेवारी जिल्हा       कापूस उत्पादक तालुक्यांची संख्या नाशिक          ३धुळे               ३नंदुरबार         २जळगाव         १५अहमदनगर   १   औरंगाबाद        ९जालना           ७बीड               ५नांदेड             ७परभणी         ६हिंगोली         २बुलढाणा         ८अकोला           ७    अमरावती        ६यवतमाळ        १३वर्धा                ८नागपूर           ६चंद्रपूर         ४

टॅग्स :PuneपुणेcottonकापूसFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार