राज्यात कापूस उपलब्धतेवरच सुतगिरणीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:33 PM2018-08-28T19:33:54+5:302018-08-28T19:40:25+5:30

ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो. फक्त अशाच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Permission for the convenience of cotton in the state | राज्यात कापूस उपलब्धतेवरच सुतगिरणीला परवानगी

राज्यात कापूस उपलब्धतेवरच सुतगिरणीला परवानगी

ठळक मुद्देसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग : ११५ तालुक्यांची यादी प्रसिध्द  सर्वसाधारणपणे सूतगिरणीसाठी एका वर्षाला किमान ४ हजार ८९६ टन कापसाची आवश्यकताराज्य शासनातर्फे राज्यातील ज्या तालुक्यात ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन

पुणे : राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन करणाºया ११५ तालुक्यांची यादी प्रसिध्द केली आहे. तसेच या कापूस उत्पादक तालुक्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सहकारी सूतगिरणी शिवाय नव्याने सहकारी सूतगिरणी स्थापन करताना ज्या तालुक्यात ५ हजार टनापेक्षा जास्त कापूस उपलब्ध होत असेल असाच तालुका नवीन सहकारी सूतगिरणी स्थापन करण्यासाठी पात्र असेल, असेही स्पष्ट केले आहे. 
राज्य शासनाने  २०१८ ते २३ या वषार्चे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असून त्यानुसार सहकारी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरिता शासकीय भागभांडवलाची योजना ही केवळ कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात  येणार आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो. फक्त अशाच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सर्वसाधारणपणे सूतगिरणीसाठी एका वर्षाला किमान ४ हजार ८९६ टन कापसाची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी नवीन सुतगिरणी स्थापन होणार आहे. तो सूतगिरणी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी दुप्पट म्हणजेच ९ हजार ६०० टन कापसाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेवून राज्य शासनातर्फे राज्यातील ज्या तालुक्यात ९ हजार ६०० टन कापूस उत्पादन होते,अशा तालुक्यांची जिल्हानिहाय यादी अध्यादेशाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील १५ व यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. ज्या तालुक्यात कापसाचे ९ हजार ६०० टनांहून अधिक उत्पादन सलग दोन वर्षे होईल, अशाच तालुक्यांचा समावेश दरवर्षी आढावा घेतल्यानंतर कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये केला जाणार आहे, असेही अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------
जिल्हानिहाय कापूस उत्पादक तालुक्यांची आकडेवारी 
जिल्हा       कापूस उत्पादक तालुक्यांची संख्या 
नाशिक          ३
धुळे               ३
नंदुरबार         २
जळगाव         १५
अहमदनगर   १   
औरंगाबाद        ९
जालना           ७
बीड               ५
नांदेड             ७
परभणी         ६
हिंगोली         २
बुलढाणा         ८
अकोला           ७    
अमरावती        ६
यवतमाळ        १३
वर्धा                ८
नागपूर           ६
चंद्रपूर         ४

Web Title: Permission for the convenience of cotton in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.