लोकशासन आंदोलन ही संघटना गेली ३० वर्षे सामाजिक काम करीत आहे. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत हे संस्थापक असून, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे अध्यक्ष आहेत. संघटनेने आतापर्यंत शोषितांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकशासन आंदोलन पक्षाची स्थापना करण्यात आली असून, लोकांचे प्रश्न लोकशाही मार्गाने जोडण्यासाठी राजकीय सत्ता हा परिवर्तनाचा सर्वांत जवळचा लोकशाहीतील एकमेव मार्ग असल्याने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटक सचिव प्रतापराव बोर्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}