शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:01 IST

Eknath Shinde Criticize Rahul Gandhi: देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. तसेच  देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

मुंबई - सध्या देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईपासून ते इतर मुद्द्यांपर्यंत सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. तसेच  देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकार अत्यंत बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल  गांधी यांच्यावर जोरदार आणि खरमरीत शब्दात टीका केली.मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय तणावामुळे देशातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, संसद सुरू असताना राहुल गांधी नेहमी परदेश दौऱ्यावर असतात. देशाच्या संसदेत चर्चा करण्याऐवजी ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्याचे काम करतात. प्रत्येक वेळी संसद अधिवेशनाच्या काळात दुसऱ्या देशात जाऊन भारताविरोधात बोलण्याची त्यांची सवयच झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

“देशात ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवाया होत असताना आपल्या जवानांनी आणि सुरक्षादलांनी केलेल्या पराक्रमाबद्दल राहुल गांधींना दुःख किंवा अभिमान काहीच वाटत नाही. उलट देशाची प्रतिमा खराब करणारी वक्तव्ये करून पाकिस्तानसारख्या देशांना मथळे मिळवून देण्याचे काम ते करत आहेत,” असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. देश वेगाने प्रगती करत असताना काही लोकांना त्याचा “पोटदुखी” होत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

देशाच्या विकासासाठी विधायक काम करण्याऐवजी देशाची बदनामी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल. देशात राहून देशासाठी काम करा, अशी बोचरी टीका शिंदे यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : People recognize those who defame India for politics: Shinde to Rahul

Web Summary : Eknath Shinde criticizes Rahul Gandhi, stating people recognize those who defame India for political gains. He accuses Gandhi of damaging India's image abroad and ignoring the nation's progress, while the government focuses on development and citizen's welfare.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस