शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात शांतता राखावी

By admin | Updated: September 14, 2015 02:22 IST

अहिंसावादी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी या समाजातील लोकांनी कोणतीही मागणी अथवा अर्ज केला नसताना त्याचे राजकीय भांडवल मात्र काही

भार्इंदर : अहिंसावादी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी या समाजातील लोकांनी कोणतीही मागणी अथवा अर्ज केला नसताना त्याचे राजकीय भांडवल मात्र काही असंतुष्ट गट करत आहेत. त्याला शहरवासीयांनी भीक घालू नये. शहरात शांतता राखावी, असे आवाहन शनिवारी मीरा रोड येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत करण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मनसे उपाध्यक्ष अरुण कदम, खाटिक समाजाचे नेते हाजी अराफत शेख उपस्थित होते.आमदार सरनाईक यांनी सांगितले की, ‘शहरात नयानगर ही मुस्लिमबहुल लोकवस्ती असतानाही १९९३ मध्ये दोन गटांत झालेल्या दंगलीतदेखील शहरात शांतता होती, हे श्रेय येथील सर्व धर्मांतील लोकांसह त्या वेळच्या स्थानिक राजकीय नेत्यांना जाते. यंदा मात्र नवख्या सत्तापिपासू नेत्यांना शहरात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.’ माजी आमदार मेंडोन्सा म्हणाले, ‘यापूर्वीच्या आघाडीच्या सत्ताकाळात असा प्रकार कधीच घडला नव्हता. परंतु, यंदा मात्र त्याला सुरुवात झाली असल्याने त्याचे वाईट परिणाम ओळखून शहरात शांतता कायम ठेवावी,’ मनसे उपाध्यक्ष कदम यांनी सांगितले, ‘आपल्या नगरसेवकपदाच्या काळात अनेकदा कत्तलखाने बंदीवरील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आले होते. सर्वपक्षीयांनी धर्माचा आदर करीत त्याला शासकीय आदेशान्वये मंजुरी दिली.’ (प्रतिनिधी)