शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

पवारांच्या मध्यस्थीने तटकरे कुटुंबातील वाद संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 06:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर तटकरे बंधुंमधील वाद अखेर संपुष्टात आला

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर तटकरे बंधुंमधील वाद अखेर संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल तटकरे या दोन्ही भावांशी चर्चा करून हा वाद मिटवला.बारामतीत शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी झालेल्या बैठकीला सुनील तटकरे, अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, अनिल तटकरेंचे धाकटे पुत्र संदीप तटकरे, सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे, सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे आदी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल तटकरे यांचे चिरंजीव संदीप तटकरे शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. सुनील तटकरे यांना हा धक्का होता. त्या वेळी अनिल तटकरे यांचे थोरले पुत्र अवधुत तटकरे यांनी शिवसेनेकडून लढणाऱ्या संदीप तटकरेंच्या प्रचाराला उपस्थिती लावली. संदीप तटकरेंचे शिवसेनेकडून लढणे, हा तटकरे कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. मात्र, निवडणुकीनंतरच तटकरे कुटुुंबात चर्चा झाली. त्यानंतर, एकत्रित कुटुंब पवार यांच्या भेटीला बारामतीला आले होते.